शॉर्ट टर्मसाठीचे कमाल स्टॉक्स, टारगेट आणि स्टॉप लॉस किती ठेवावा?

टाटा समूहाची ही चांगली कंपनी आहे.
Share
ShareSakal
Updated on
Summary

सध्या धातूंचा साठा विशेषत: स्टील चांगली कामगिरी करत आहे.

Stocks to Buy: मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी टाटा मेटालिक (Tata Metaliks) आणि एव्हरेस्ट इंड (Everest ind) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

टाटा मेटालिक्सबद्दलचे (Tata Metaliks) विकास सेठी यांचे मत

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी टाटा मेटालिक्सचे शेअर्स खरेदी करायचा सल्ला दिला आहे. सध्या धातूंचा साठा विशेषत: स्टील चांगली कामगिरी करत आहे. टाटा समूहाची ही चांगली कंपनी आहे. यामध्ये टाटा समूहाची 60 टक्के भागीदारी आहे. त्याचबरोबर, पिग आयर्न तयार करणारी ही देशातील दुसरी मोठी कंपनी आहे. टाटा मेटॅलिक्सचे पिग आयर्न पॉवर, ऑटो, रेल्वे आणि कृषी क्षेत्रात वापरले जाते.

Share
आधार कार्डद्वारे पर्सनल लोन कसे घ्यायचे? जाणून घ्या...

कंपनीचे फंडामेंटल्स ?

चे जून तिमाहीचे निकाल खूप चांगले होते. कंपनीने 94 कोटींचा पीएटी (Profit After Tax) मिळवला. त्यांचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन (OPM) 18-20 टक्के आहे. त्याच वेळी, कॅपिटल एम्प्लॉइड परतावा (ROCE) 22 टक्के आहे. विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. मेटल क्षेत्रासाठी ऑक्टोबर महिना चांगला राहील, अशी आशा सेठी यांनी व्यक्त केली.

टाटा मेटॅलिक्स (Tata Metaliks )

CMP -1075.95 रुपये

लक्ष्य (Target) - 1150 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 1110 रुपये

Share
येत्या दोन महिन्यांत 30 कंपन्यांचे IPO येणार? 45,000 कोटी उभारणार

एव्हरेस्ट इंडमध्ये (Everest ind) का खरेदी करावी?

एव्हरेस्ट इंडस्ट्रीज ही बांधकाम साहित्याची (Building Material) निर्मिती करणारी देशातील एक मोठी कंपनी आहे. देशभरात याचे 7000 डीलर्स आहेत. 1 लाख गावे आणि 600 शहरांचे वितरण (Distribution) नेटवर्क आहे. रिअल इस्टेट क्षेत्र अजूनही फोकसमध्ये आहे आणि त्याच्याशी संबंधित अनेक मोठे निर्णय देखील घेतले गेले आहेत, त्यामुळेच एव्हरेस्ट इंडस्ट्रीजला या क्षेत्रातील तेजीचा फायदा होईल.

परफॉर्मन्स कसा राहिला ?

जून तिमाहीत त्याचा 20 कोटींचा पीएटी (Profit After Tax) होता. कंपनीवरील कर्ज खूप कमी आहे. कॅपिटल एम्प्लॉयडवर त्याचा परतावा (ROCE) 18 टक्के आहे. त्यामुळेच सेठी यांनी शॉर्ट टर्म अर्थात अल्पावधीसाठी याचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला.

CMP - 450.75 रुपये

लक्ष्य (Target) - 475 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 435 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()