ज्या प्रमाणे ‘टीडीएस’ कापला जाऊ नये म्हणून प्राप्तिकर कायद्यात ‘फॉर्म १३’ दाखल करून कपात न करण्याची अनुमती मिळू शकते. त्याच तत्वावर ‘टीसीएस’ कापला जाऊ नये म्हणून कायद्यात ‘फॉर्म २७ सी’चा अंतर्भाव करण्यात आला होता. याबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे नुकतीच आठ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात ‘सीबीडीटी’ने जारी केल्याने यात आता स्पष्टता आली आहे. त्यामुळे विशिष्ट वस्तूंचे निर्माण, उत्पादन, प्रक्रिया करण्यासाठी किंवा उत्पादनासाठी वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्या अनेक व्यवसायिक करदात्यांची ‘टीसीएस’कापल्याने झालेल्या मनःस्ताप व आर्थिक कोंडीतून सुटका झाली आहे.
‘फॉर्म २७ सी’ हा व्यवसाय करणाऱ्या करदात्यांना वरदान ठरावा. प्राप्तिकर कायदा, १९६१ नुसार विशिष्ट परिभाषित वस्तूंचे ‘खरेदीदार’आणि ‘विक्रेते’या फॉर्मचा वापर करू शकतात. काही नियमांची पूर्तता केल्यावर, करदात्याने हा फॉर्म दाखल केला, तर त्याला स्रोतावर जमा करावा लागणारा ‘टीसीएस’ भरायची गरज नाही व परिणामी किफायतशीर व्यवहार करता येईल.
‘फॉर्म २७ सी’ कोणाला कोणत्या कारणासाठी दाखल करता येईल
जेव्हा काही कलमात उल्लेखलेल्या वस्तू खरेदी करून त्या वस्तू निर्माण, उत्पादन किंवा वस्तूंच्या प्रक्रियेसाठी वापरल्या जाणार असतील अशावेळी हा फॉर्म दाखल करता येतो.
वस्तूंची खरेदी देवघेवी स्वरूपाच्या व्यापारासाठी (Trading) असेल तर या फॉर्मचा वापर करता येत नाही.
‘फॉर्म २७ सी’ कसा भरावा?
या फॉर्ममध्ये दोन भाग आहेत या फॉर्मचा भाग- एक स्वतः खरेदीदाराने भरून विक्रेत्यास देणे गरजेचे आहे.
हा फॉर्म विक्रेत्याने प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. विक्रेत्यास टॅन असणे आवश्यक आहे व तो ई-फायलिंग पोर्टलवर नोंदीत असला पाहिजे. फॉर्मच्या भाग-१मध्ये, खरेदीदाराचा तपशील, पॅन क्रमांक, पत्ता, मिळवलेल्या वस्तूंची यादी आणि खरेदीचा उद्देश प्रदान करावा लागेल. तर फॉर्मच्या भाग -२ मध्ये, विक्रेत्याचे तपशील, पॅन आणि टॅन, पत्ता, विक्रेत्याची श्रेणी प्रदान करावी लागेल.
हा फॉर्म खरेदीदारांकडून मिळाल्यानंतर येणाऱ्या सात तारखेच्या आत विक्रेत्याने दाखल करणे गरजेचे आहे.
प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर पॅन व पासवर्ड वापरून लॉग-इन करून हा फॉर्म निवडून त्यात आवश्यक ती माहिती भरून अपलोड करावयाचा आहे. आता भौतिक स्वरूपात फॉर्म दाखल करता येत नाही.
कोणत्या वस्तू-मालासंदर्भात सवलत मिळते?
मानवी वापरासाठी अल्कोहोलयुक्त मद्य, भारतीय बनावटीची विदेशी दारू
तेंदूची पाने
जंगल लीजद्वारे खरेदी केलेले लाकूड
कोणत्याही माध्यमातून खरेदी केलेले लाकूड
इतर कोणतेही वन उत्पादन
भंगार (उत्पादनातील कचरा आणि भंगार किंवा सामग्रीचे यांत्रिक कार्य, जसे की तुटणे, कापणे, झीज होणे किंवा इतर कारणांमुळे वापरण्यायोग्य)
पार्किंग लॉट, टोल प्लाझाचा परवाना देणे किंवा भाडेतत्त्वावर देणे
खाणकाम आणि उत्खनन
खोटी माहिती दिल्यास कारावास
या फॉर्मच्या शेवटी प्रकटीकरण द्यायचे आहे व त्याच्या खरेपणाबद्दल प्राप्तिकर विभागाच्या मनात किंतू राहू नये म्हणून खोटी माहिती देण्याऱ्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७७ अंतर्गत किमान तीन महिने ते सात वर्षांपर्यंत सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
कोणते करदाते हा फॉर्म अपलोड करू शकतात ?
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट -सीए आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.