TCS Share : या आयटी कंपनीने गुंतवणुकदारांना केले मालामाल, टारगेटमध्ये वाढ

टीसीएस गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे.
TCS Company Share
TCS Company Share esakal
Updated on

TCS Share : आयटी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. टीसीएस गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे आणि 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे 25 पटीपेक्षा जास्त वाढवले आहेत.

TCS Company Share
Share Market: शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह, सेन्सेक्स 750 अंकांनी गडगडला

पण, टीसीएसच्या शेअर्सवर यंदा विक्रीचा दबाव दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणि जागतिक स्तरावर कठोर आर्थिक धोरणांमुळे आयटी कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र, तरीही फ्रान्सच्या इंटरनॅशनल बँकिंग ग्रुपने या शेअरला बाय रेटिंग दिले आहे. बीएसईवर टीसीएसच्या शेअरची किंमत 3064.95 रुपये आहे.

TCS Company Share
Share Market : आज 10 शेअर्स करतील परफॉर्म ? जाणून घ्या

मल्टीबॅगर टीसीएस

27 ऑगस्ट 2004 ला टीसीएसचे शेअर्स केवळ 120.29 रुपयांना होते, जे आता 25 पटीने वाढून 3064.95 रुपये झाले आहेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता ते 25 लाखांच्या पुढे गेले असते.

TCS Company Share
Share Market: आयपीओनंतर 4 महिन्यांत 90% वाढला 'हा' शेअर

सध्या हा शेअर 32 टक्क्यांच्या डिस्काउंटवर मिळत आहे. 18 जानेवारी 2022 ला तो 4,045.50 रुपयांच्या विक्रमी 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. त्यानंतर विक्रीचा दबाव दिसून आला आणि 26 सप्टेंबर 2022 ला तो 2926 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. मात्र, त्यानंतर 4 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे.

TCS Company Share
Share Market: फक्त 7 रुपयांवर लिस्ट झालेल्या 'या' कंपनीत एकाच वर्षात 93 पट वाढ

बीएनपी पारिबासने टीसीएसमधील गुंतवणुकीसाठी 3700 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, म्हणजेच तुम्ही सध्याच्या 3064.95 रुपयांच्या किंमतीवर गुंतवणूक करून 20 टक्के नफा मिळवू शकता. दुसरीकडे, ऍक्सिस सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणुकीसाठी 3650 रुपयांचे टारगेट दिले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा 19 टक्के जास्त आहे.

TCS Company Share
Share Market : प्राज इंडस्ट्रीजचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर, आणखी तेजी येईल का ?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.