share market
share marketsakal

Share Market Udates: युद्धाचा आठवा दिवस...शेअर बाजारात घसरण सुरुच

Share Market Udates: रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर होत असून आजही शेअर बाजाराची नकारात्मक सुरुवात झाली आहे.
Published on

Share Market Udates: रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणाम या आठवड्याच्या शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले. रशिया युक्रेन युद्धामुळे या आठवड्यात जगभरातल्या इतर शेअर बाजारांप्रमाणे भारतीय शेअर बाजारामध्ये (Share Maket) मोठी घसरण झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीही कोसळले. निफ्टी सुरु होताना 159 अंकाच्या घसरणीसह 16339 च्या पातळीवर सुरु झाला, तर सेन्सेक्सही 503 अंकांनी कोसळून 54653 वर सुरु झाला.

share market
क्रूडच्या वाढत्या किमतीने शेअर बाजार घसरलं; रशिया- युक्रेन युद्धाचा फटका

या आठवड्यात निफ्टीची परिस्थिती काय होती?-

सोमवारी निफ्टी (Nifty) सुमारे 1000 अंकांनी कोसळून 16203 च्या पातळीपर्यंत खाली होता. त्यानंतर मात्र निफ्टी सावरल्याचं दिसून आले. मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये निफ्टीने 16400 ते 16800 च्या पातळीत स्थिर राहिला. गुरुवारी वीकली एक्स्पारयरीच्या दिवशी 16498 च्या पातळीवर बंद झाला.

share market
शेअर बाजार कोसळला...युद्धाच्या पाचव्या दिवशी सेंसेक्समध्ये ७०० अंकाची घट

आठवडाभरात सेन्सेक्सने काय परिस्थिती होती?-

सेन्सेक्समध्येही (Sensex) या आठवड्याच्या सुरुवातीला मोठी घसरण झाली. परंतु आठवड्याशेवटी मात्र तो ठराविक पातळीत स्थिर झाल्याचं दिसून आले. सोमवारी सेन्सेक्स सुमारे 3350 अंकांनी कोसळलून 54369 पर्यंत तो खाली आला होता. ऑगस्ट महिन्यानंतर प्रथमच सेन्सेक्सने इतका निचांक गाठला होता. मात्र सेन्सेक्स एका ठराविक पातळीत असल्याचं दिसून आलं. गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी सेन्सेक्स 55156 अंकांवर बंद झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()