सर्वसामान्यांचा Corporate FDमध्ये वाढता इंटरेस्ट!

कॉर्पोरेट एफडीमधून (Corporate FD) मिळणारा जास्त परतावा सगळ्यांना आकर्षित करतो आहे.
Corporate FD
Corporate FDesakal
Updated on
Summary

कॉर्पोरेट एफडीमधून मिळणारा जास्त परतावा सगळ्यांना आकर्षित करतो आहे.

शेअर्सचे उच्च मूल्यांकन (Valuation) आणि बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार (Investors) एफडीकडे आपले लक्ष केंद्रीत करत आहेत. कॉर्पोरेट एफडीमधून (Corporate FD) मिळणारा जास्त परतावा सगळ्यांना आकर्षित करतो आहे.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (Fixed Deposit) लोकांचा इंटरेस्ट वाढायला सुरुवात झाली आहे. कॉर्पोरेट एफडीतील जास्त परतावा त्यांना आकर्षित करतो. HDFC लिमिटेड, बजाज फायनान्स आणि ICICI होम फायनान्स सारख्या बलाढ्य कंपन्या 10 ते 15 बेस पॉइंट्स जास्त व्याजदर देत आहेत.

Corporate FD
SBI देणार आता FD वर जादा परतावा! बॅंकेने वाढवला व्याजदर

सुरक्षित आणि अंदाजे परतावा हवे. गुंतवणूकदार कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक करण्यास पुढे येत आहेत असे मुंबईतील फाइनेंशियल डिस्ट्रिूब्यूटर विनायक कुलकर्णी म्हणाले. कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास 6.8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त 0.25 टक्के मिळत आहे. यामुळे बजाज फायनान्स आणि एचडीएफसी लिमिटेडचा परतावा 7.05 टक्क्यांपर्यंत जातो."

फिक्स्ड डिपॉझिट ही सगळ्यांची आवडती आहे कारण फिक्स्ड डिपॉझिटवर काही न करता अधिकचे पैसे मिळवण्याची सगळ्यात सोपी पध्दत आहे असे बजाज कॅपिटलचे मुख्य उत्पादन अधिकारी विनय तालुजा म्हणाले. दुसरीकडे कॉर्पोरेट एफडी तुम्हाला बँक ठेवींच्या अर्थात फिक्स्ड डिपॉझिटच्या तुलनेत 100 ते 150 बेस पॉइंट्स अल्फा अर्थात जास्त परतावा देते असेही ते म्हणाले. त्यामुळेच कॉर्पोरेट एफ डी करणाऱ्यांचे प्रमाण आता दुप्पट झाले आहे.

Corporate FD
बजाज फायनान्स FD वरील आकर्षक एफडी व्याज दराचे लाभ

डेट फंडांच्या (Debt Funds) खराब परताव्यानेही गुंतवणूकदारांची निराशा केली असल्याचे वित्तीय नियोजकांचे म्हणणे आहे. लिक्विड फंडांचा परतावा केवळ 3.2 टक्क्यांवर आला आहे. महागाई लक्षात घेता, व्याजदर वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे या निधीतून मिळणारा परतावा आगामी काळात कमकुवत राहील. पण, गुंतवणूकदारांनी कॉर्पोरेट एफडीमध्ये हुशारीने गुंतवणूक करावी. यातून मोठा परतावा मिळतो पण बँक एफडीपेक्षा धोकाही मोठा असतो हे लक्षात असू द्या.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.