एलन मस्क, अंबानी अन्‌ अदानी या अब्जाधीशांच्या संपत्तीत क्षणार्धात घट

एलन मस्क, अंबानी अन्‌ अदानी या अब्जाधीशांच्या संपत्तीत क्षणार्धात घट! काय आहे कारण?
अंबानी अन्‌ अदानी
अंबानी अन्‌ अदानीesakal
Updated on
Summary

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्‍सच्या वेबसाइटनुसार टॉप 15 अब्जाधीशांपैकी 12 जणांची संपत्ती क्षणार्धात कमी झाली आहे.

एलन मस्कसह (Alan Musk) जगातील बड्या अब्जाधीशांच्या (Billionaire) संपत्तीत मोठी घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्‍सच्या (Bloomberg Billionaire Index) वेबसाइटनुसार टॉप 15 अब्जाधीशांपैकी 12 जणांची संपत्ती क्षणार्धात कमी झाली आहे. भारतातील मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांचाही 12 अब्जाधीशांमध्ये समावेश आहे, ज्यांची संपत्ती कमी झाली आहे. वॉरेन बफे, फ्रॅंकोइस बेटेंकोर्ट मेयर्स आणि झोंग शानशान या टॉप 15 मधील फक्त तीन अब्जाधीशांच्या संपत्तीत किरकोळ वाढ झाली आहे.

अंबानी अन्‌ अदानी
Jio युजर्सना आणखी एक धक्का! 'हे' 4 महत्त्वाचे प्रीपेड प्लॅन्स बंद

एलन मस्क यांचे सर्वात मोठे नुकसान

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचे सर्वांत मोठे नुकसान झाले आहे. मस्कची संपत्ती $15.2 अब्जने कमी झाली आहे. आता एलन मस्कची एकूण संपत्ती 269 अब्ज डॉलर आहे. एलन मस्कप्रमाणेच भारताचे मुकेश अंबानी यांनाही दुसऱ्या क्रमांकाचे मोठे नुकसान झाले आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 3.13 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

अदानींना झटका

ऍमेझॉनचे जेफ बेझोस व्यतिरिक्त, स्टीव्ह वॉलमर आणि लॅरी ऍलिसन यांच्या संपत्तीतही $2 बिलियनपेक्षा जास्त घट झाली आहे. त्याचबरोबर भारताच्या गौतम अदानी यांना $535 दशलक्षचे नुकसान झाले आहे. सध्या मुकेश अंबानी यांची संपत्ती $90.6 बिलियन आहे. त्याचवेळी गौतम अदानींबद्दल बोलायचे झाले, तर त्यांची संपत्ती 77.2 अब्ज डॉलर आहे.

काय आहे कारण?

अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घसरण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोनाचे नवीन व्हेरिएंट Omicron. ओमिक्रॉनच्या चिंतेमुळे भारतासह जगभरातील शेअर बाजार दबावाखाली आहेत. त्यामुळे बहुतांश अब्जाधीश कंपन्यांचे शेअर्सही घसरत आहेत.

अंबानी अन्‌ अदानी
पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट करतोय Omicron!

स्टॉकमध्ये घट म्हणजे बाजार भांडवल कमी होईल, हे देखील अब्जाधीशांच्या संपत्तीचे एक माप आहे. याशिवाय महागाई आणि आर्थिक संकटाच्या भीतीने टेक्‍नॉलॉजी स्टॉक्‍समध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना मोठा झटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.