ओमिक्रोनचे बाजारावर सावट! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

भारतीय शेअर बाजारातील गेल्या दोन व्यापार सत्राती मोठी घसरण झाली
shares
sharesesakal
Updated on
Summary

भारतीय शेअर बाजारातील गेल्या दोन व्यापार सत्राती मोठी घसरण झाली.

भारतीय शेअर बाजारातील गेल्या दोन व्यापार सत्राती मोठी घसरण झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 5.80 लाख कोटी बुडाले. बीएसई सेन्सेक्स सोमवारी 949.32 अंकांच्या घसरणीसह 56,747.14 वर बंद झाला. या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये, बीएससीवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल ( Market Capitalisation) गेल्या दोन सत्रांमध्ये 5,80,016.37 कोटी रुपयांनी घसरून 2,56,72,774.66 कोटी रुपयांवर आले. कोरोनाच्या नव्या व्हेरीएंट अर्थात ओमिक्रॉनमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे शेअर बाजार घसरल्याचे तज्ज्ञांच्या म्हणणे आहे.

शुक्रवारप्रमाणेच सोमवारीही बाजारात सुमारे 1.5 टक्क्यांची घसरण झाली. बाजाराची सुरुवात फ्लॅट झाली, पण कमकुवत जागतिक संकेत आणि नवीन कोविड प्रकारांची वाढती प्रकरणे यामुळे, गुंतवणूकदारांची चिंता वाढली आणि जवळपास सर्वच क्षेत्रात विक्री झाल्याचे दिसून आल्याचे रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष (संशोधन), अजित मिश्रा म्हणाले.

shares
शेअर बाजार तज्ज्ञांकडून Ipca Laboratoriesचे शेअर्स घेण्याचा सल्ला!

भारतात ओमिक्रॉनची आतापर्यंत 21 केस आढळून आल्या आहेत. त्यापैकी 17 केसेस एकट्या सोमवारी नोंदवली गेल्या, ज्यामध्ये राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 9 जणांना, पुण्यात 7 जण आणि राजधानी दिल्लीत 37 वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून आले. सेन्सेक्समधील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये इंडसइंड बँकेत सर्वाधिक ४ टक्क्यांची घसरण झाली. व्यापक बाजारपेठेत, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही 1.35 टक्क्यांची घसरण झाली.

कोविडच्या नवीन प्रकारांबद्दलची चिंता आणि व्याजदरावरील आरबीआयच्या आगामी बैठकीमुळे बाजार अस्थिर राहिल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले.

shares
Go Fashionचे शेअर्स वधारले! गुंतवणूकदारांना तब्बल 91 टक्क्यांचा परतावा

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

- टाटा कन्झ्युमर्स (TATACONSUME)

- बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

- भारती एअरटेल लिमिटेड (BHARTIARTL)

- टीसीएस (TCS)

- एनआयआयटी टेक्नोलॉजीज (COFORGE)

- बालकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

- मॅक्स फायनांशियल सर्व्हिसेज (MFSL)

- गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

- एल. अँड टी. टेक्नोलॉजी सर्व्हिसेज लिमिटेड (LTTS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.