Crypto currency : कूटचलनांची किंमत वधारली; बाजारात उत्साहाचे वातावरण

सर्वोत्तम १० मध्ये समावेश होणाऱ्या डॉजकॉइन आणि लाइटकॉइनमधील गुंतवणूकदारांच्या गेल्या २४ तासांत बराच फायदा झाला आहे.
crypto currency
crypto currencygoogle
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टो बाजाराने गुंतवणूकदारांना चांगलंच रडवलंय. पण आता पुन्हा या बाजारात उत्साहाचं वातावरण दिसून येतंय. सोमवारी बिटकॉइन इथेरियमसह लाइटकॉइन आणि पोल्काडॉटपर्यंत सर्वच क्रिप्टो करन्सीमध्ये तेजी दिसून आली.

crypto currency
शेअर बाजार किंचित वधारला; गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगली स्थिती

जगातील सर्वात लोकप्रिय बिटकॉइनच्या किंमतीत गेल्या २४ तासांत ९० टक्के वाढ झाली आहे आणि त्याची किंमत २० हजार डॉलरपेक्षाही अधिक झाली आहे. दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय कूटचलन इथेरियमच्या किंमतीत १२ टक्क्यांची वाढ होऊन ८८ हजार ८४८ रुपयांवर गेली आहे.

crypto currency
१ रुपयाचे नाणे विका आणि बना कोट्यधीश

सर्वोत्तम १० मध्ये समावेश होणाऱ्या डॉजकॉइन आणि लाइटकॉइनमधील गुंतवणूकदारांच्या गेल्या २४ तासांत बराच फायदा झाला आहे. याच्या किंमतीत ११ टक्के वाढ झालेली दिसून आली. बिनांस क्वाइनमध्ये ७ टक्क्यांची वाढ होऊन तो १७ हजार १०१ रुपयांवर गेला. तसेच कार्डनोमध्ये ५ टक्क्यांची वाढ होऊन तो ३९ रुपयांवर गेला.

गेल्या आठवड्यात कूटचलन बाजारात आलेल्या मंदीमुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली होती. पूर्ण आठवड्यात कूटचलनात गुंतवणूक करणाऱ्यांना २२ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते. बिटकॉइन, इथेरियम, लाइटकॉइन, डॉजकॉइन यांच्यासोबतच टेथरनेही आपल्या गुंतवणूकदारांची कमाई बुडवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.