केमिकल शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या 10 वर्षात काही केमिकल स्टॉक्सनी लोकांना श्रीमंत केले आहे.
केमिकल शेअर्सनी (Chemical Stocks) गुंतवणूकदारांना (Investors) जोरदार परतावा दिला आहे. गेल्या 10 वर्षात काही केमिकल स्टॉक्सनी लोकांना श्रीमंत केले आहे. या केमिकल स्टॉक्समध्ये गुंतवलेल्या एक लाख रुपयांचे मूल्य आता कोटींवर पोहोचले आहे. येथे अशा 3 केमिकल स्टॉक्सबद्दल सांगत आहोत, ज्यांनी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीला कोटींमध्ये रूपांतरित करण्याचे काम केले आहे. या केमिकल स्टॉक्सने 22,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया की हे स्टॉक्स कोणते आहेत आणि त्यांनी आतापर्यंत गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे त्याबाबत. (The return on these shares is a whopping twenty two thousand percent)
या केमिकल स्टॉक्सने दिला 22,000 टक्क्यांहून अधिक परतावा
केमिकल कंपनी Paushak Limited ने जबरदस्त परतावा दिला आहे. 10 जानेवारी 2012 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange - BSE) वर 46.50 रुपयांच्या पातळीवर होते. 10 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 10,394.85 रुपयांवर बंद झाले. Paushak Limited च्या शेअर्सने गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 22,255 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 10 जानेवारी 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या ही रक्कम 2.23 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
Alkyl Amines Chemicals ने दिला 22,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा
6 जानेवारी 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर Alkyl Amines Chemicals चे शेअर्स Rs 15.92 च्या पातळीवर होते. 11 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 3,679.65 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 10 वर्षांत 22,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 जानेवारी 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या ही रक्कम 2.3 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
दीपक नायट्रेटने दिला 17,000 टक्क्यांहून अधिक परतावा
6 जानेवारी 2012 रोजी दीपक नायट्रेटचे (Deepak Nitrite) शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 15.40 रुपयांच्या पातळीवर होते. 11 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 2,572.95 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 16,700 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 6 जानेवारी 2012 रोजी दीपक नायट्रेटच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले आणि आपली गुंतवणूक ठेवली असती, तर सध्या ही रक्कम 1.67 कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.