शेअर बाजार कोसळला, सेंसेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण

Share Market Latest Updates
Share Market Latest UpdatesSakal
Updated on

Share Market Live Update: रशिया-युक्रेनच्या युध्दाच्या दरम्यान सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये आज मोठी घट दिसून आली. मंगळवारी सकाळी 9.30 वाजता बीएसईचा 30 शेअर्रचा बेंचमार्क सेन्सेक्स 412 अंकांनी घसरून 52430 वर सुरू झाला. दुसरीकडे निफ्टीची सुरुवातही आज लाल चिन्हाने झाली. सुरुवातीच्या वाढीमध्ये, सेन्सेक्समध्ये सुधारणा होत राहिली आणि 93.56 तोट्यासह, पातळी 52,749.19 पर्यंत वाढली. तर निफ्टी 41 अंकासह कोसळून 15830 वर पोहचला. (Sensex-Nifty falling )

अमेरिकन बाजार सोमवारी जोरदार घसरणीसह बंद झाले. डाऊ जोन्स 797 अंकांनी किंवा 2.37 टक्क्यांनी घसरून 32,817 वर, तर Nasdaq 3.62 टक्क्यांनी घसरून 12,830 वर बंद झाला. SNDP 2.95 टक्क्यांनी घसरून 4201 वर बंद झाला.

Share Market Latest Updates
10वी पास उमेदवारांना परिक्षेशिवाय नोकरीची संधी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

अमेरिकन बाजार सोमवारी जोरदार घसरणीसह बंद झाले. डाऊ जोन्स 797 अंकांनी किंवा 2.37 टक्क्यांनी घसरून 32,817 वर, तर Nasdaq 3.62 टक्क्यांनी घसरून 12,830 वर बंद झाला. SNDP 2.95 टक्क्यांनी घसरून 4201 वर बंद झाला.सोमवारची स्थिती : कच्च्या तेलाच्या किंमती139 वर पोहोचल्या

युनायटेड स्टेट्सने त्याच्या सहयोगी देशांसोबत रशियन पुरवठ्यावर संभाव्य निर्बंधांवर चर्चा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती 139 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत, ही 2008 नंतरची सर्वोच्च पातळी आहे. मात्र, काही वेळा त्यात घट दिसून आली. संध्याकाळी ब्रेंट क्रूड 125 डॉलर प्रति बॅरलच्यावर व्यवहार करत होते.

परिणाम : कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत पेट्रोल -डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वृद्धी होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. तज्ज्ञांच्या माहितीनसार, यूपीमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर मंगळवारपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढू शकतात.

Share Market Latest Updates
Gold Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ! जाणून घ्या नवे दर

सेंसेक्समध्ये 1,491 अंकाची मोठी घट

रशिया-युक्रेनच्या संघर्षामुळे कच्चे तेलाचे दर वाढल्यामुळे आणि जागतिक बाजारामध्ये मंदीमुळे देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये सोमवारपासून मोठी घट झाली आहे. 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 1,491.06 अंकांनी घसरून 52,842.75 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 382.20 अंकांनी घसरून 15,863.15 अंकांवर आला.

परिणाम : सेन्सेक्समधील या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 5.68 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्समधील घसरणीमुळे केवळ मार्चच्या पहिल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांना 10.41 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

Share Market Latest Updates
निवडणुका संपताच अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले

डॉलरच्या तुलनेत रुपया 84 पैशांनी घसरून 77.01 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला

इंटरबँक परकीय चलन बाजार, सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 84 पैशांनी घसरून 77.01 वर आला. यापूर्वी, रुपयाने प्रति डॉलर 76.86 या सर्वात नीचांकी पातळी गाठली होती.

परिणाम : रुपयाचे मूल्य घसरल्याने देशांतर्गत चलनवाढ आणि व्यापार तूट वाढू शकते. त्यामुळे व्यापाऱ्यांना आयातीवर अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. रुपया 84 पैसे घसरून 77.01 प्रति डॉलर के सर्वात खालच्या पातळीवर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.