मुंबई : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्स १६१.०४ अंकांनी म्हणजेच ०.३१ टक्क्यांनी वधारला व ५१,५२१.४६ अंकांवर स्थिर झाला. निफ्टी ४१.७० अंकांनी म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी वधारला व १५,३२३.२५ अंकांवर स्थिर झाला.
गेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला होता. रेपोरेटमध्ये वाढ झाल्याने बँकांची कर्जे महागली असून त्याचा परिणाम बँकांच्या शेअर्सवर झालेला दिसत होता. जागतिक बाजारातील पडझडीचा परिणामही येथे दिसून येत होता; मात्र या आठवड्याच्या प्रारंभी स्थिती काहीशी सुधारलेली दिसली. (Todays Share Market Updates)
गेल्या कित्येक दिवसापासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू आहे. शेअर बाजारातील अस्थिरता सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकांतून दिसून येत आहे.
जोपर्यंत निफ्टी १६ हजार २०० च्या खाली जात नाही, तोपर्यंत त्यात एक पुलआउट दिसू शकतो. १६ हजार ५०० ते १६ हजार ६०० मधील पातळी दिसल्यास, तुम्ही नफा बुक (Profit Booking) केला पाहिजे. जोपर्यंत तो या पातळीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ट्रेड करु नका असा सल्ला कॅटॅलिस्ट वेल्थचे प्रशांत सावंत देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.