मुलीच्या लग्नाचं वय वाढल्यानंतर या योजनेत सरकार काही बदल करण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार (Central Government) मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याची तयारी करत आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याचा परिणाम सुकन्या समृद्धी योजनेवर (Sukanya Samrudhi Yojana - SSY) होईल का, याबाबत सध्या तर्क लावले जात आहेत. मात्र मुलीच्या लग्नाचं वय वाढल्यानंतर या योजनेत सरकार काही बदल करण्याची शक्यता आहे. ही योजना पालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र, सुकन्या समृद्धी योजनेतील बदलांबाबत तर्क का लावले जात आहेत ते समजून घेऊया. (The Sukanya Samriddhi Yojana is also likely to change if girl's marriage age increases)
काय आहे कारण?
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने (Narendra Modi Government) जेव्हा सुकन्या समृद्धी योजना सुरू केली तेव्हा तिचा एक प्रमुख उद्देश मुलींच्या विवाहाशी संबंधित होता. या योजनेत अशा अनेक अटी आहेत ज्या मुलीच्या लग्नाच्या वयाच्या आधारावर अर्थात 18 वर्षे निश्चित केल्या होत्या.
सध्या कोणती परिस्थिती आहे?
उदाहरणार्थ, सरकारच्या या योजनेत 10 वर्षापर्यंतच्या मुलीसाठी खाते उघडता येते. त्याच वेळी, मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत हे खाते पालक चालवू शकतात. याशिवाय मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातून काही रक्कम काढता येते. आतापर्यंत मुलींच्या लग्नासाठी 18 वर्षे योग्य असल्याचे सरकारचे मत होते, मात्र नवीन प्रस्तावानंतर ते 21 वर्षे केले जाऊ शकते.
पैसे कधी जमा होतील?
सध्या सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडण्याच्या तारखेपासून 15 वर्षांसाठी जमा केले जाते. म्हणजे जर तुमची मुलगी 10 वर्षांची असेल तर तिच्या सुकन्या समृद्धी खात्यात 25 वर्षांची होईपर्यंत पैसे जमा केले जातात. त्याच वेळी, मॅच्युरिटी किंवा क्लोजर कालावधी 21 वर्षे आहे. म्हणजे 2022 मध्ये हे खाते उघडले तर ते 2043 मध्ये बंद होईल. याशिवाय, मुलीच्या वयाच्या 18 वर्षांनंतर (लग्नाच्या 1 महिना आधी किंवा लग्नाच्या तारखेनंतर 3 महिन्यांनंतर) मुलीच्या लग्नाच्या वेळी खाते परिपक्व होते. लग्नाच्या वयात बदल झाल्यास हा नियम बदलू शकतो.
योजनेचे वैशिष्ट्य
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 7.6 टक्के व्याज देते. या खात्यात तुम्ही वार्षिक आधारावर 250 ते 1,50,000 रुपयांपर्यंत जमा करू शकता. एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात ठेवींच्या संख्येवर मर्यादा नाही. याचा अर्थ तुम्ही केव्हाही कितीही रक्कम जमा करू शकता. हे खाते जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते. त्याच वेळी, योजनेमध्ये 80C अंतर्गत कर सूट देखील उपलब्ध आहे. हे खाते तुम्ही बॅंक (Bank) किंवा पोस्ट ऑफिसमधून (Post Office) उघडू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.