घर खरेदी करताय? तर जाणून घ्या SBI सह टॉप 10 बॅंकांमधील व्याजदर
जर तुम्ही देखील गृहकर्जाचा विचार करत असाल तर सर्वप्रथम व्याज तपासा; कारण माहितीच्या अभावामुळे तुम्ही स्वत:चे नुकसान करून घेऊ शकता.
प्रत्येकाला स्वतःचे घर (Home) असावे असे वाटते. पण अनेक वेळा पैशांअभावी लोकांना घर घेता येत नाही. अशा परिस्थितीत गृहकर्ज (Home Loan) हा एक चांगला पर्याय असू शकतो. देशातील खासगी आणि सरकारी बॅंकांमधून (Banks) गृहकर्ज सहज मिळू शकते.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील गृहकर्जाचा विचार करत असाल तर सर्वप्रथम व्याज तपासा; कारण माहितीच्या अभावामुळे तुम्ही स्वत:चे नुकसान करून घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया देशातील टॉप टेन बॅंका ज्या सर्वांत स्वस्त गृहकर्ज देत आहेत.
टॉप टेन बॅंका : व्याज दर (%) : EMI (रु.)
युनियन बॅंक ऑफ इंडिया : 6.40-7.40 : 22,191-23,985
इंडियन बॅंक : 6.50-7.50 : 22,367-24,168
बॅंक ऑफ बडोदा : 6.50-8.10 : 22,367-25,280
बॅंक ऑफ इंडिया : 6.50-8.85 : 22,367-26,703
कोटक महिंद्रा बॅंक : 6.55-7.20 : 22,456-23,620
स्टेट बॅंक ऑफ इंडिया : 6.70-6.90 : 22,722-23,079
ICICI बॅंक : 6.70-7.55 : 22,722-24,260
HDFC : 6.70-7.65 : 22,722-24,444
पंजाब नॅशनल बॅंक : 6.75-8.80 : 22,811-26,607
ऍक्सिस बॅंक : 6.75-10.00 : 22,811-28,752
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.