'क्रेडिट कार्ड'च्या जाळ्यात अडकलात? जाणून घ्या बाहेर पडण्याचा मार्ग

क्रेडिट कार्ड कर्जाच्या जाळ्यात अडकलात? जाणून घ्या बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग
क्रेडिट कार्ड कर्जाच्या जाळ्यात अडकलात? जाणून घ्या बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग
क्रेडिट कार्ड कर्जाच्या जाळ्यात अडकलात? जाणून घ्या बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग esakal
Updated on
Summary

क्रेडिट कार्डबद्दल सर्वात मोठा गैरसमज म्हणजे क्रेडिट कार्ड ग्राहकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवतात.

क्रेडिट कार्डबद्दल (Credit Card) वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे क्रेडिट कार्ड ग्राहकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवतात. तुम्हीही क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या जाळ्यात अडकला असाल तर यातून बाहेर पडण्याचे उपाय जाणून घ्या. सावधगिरी बाळगून तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जापासून मुक्त होऊ शकता. (These are the best ways to get out of a credit card debt)

क्रेडिट कार्ड कर्जाच्या जाळ्यात अडकलात? जाणून घ्या बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग
Reliance Jio चे 'हे' प्लॅन्स करतील तुमची हजारो रुपयांची बचत!

सर्वात सोपा आणि योग्य मार्ग म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून काही बचत किंवा आर्थिक मदत घेऊन तुम्ही क्रेडिट कार्ड कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकता. आर्थिक मदत घेताना थोडा वेळ नक्कीच मागा. याचा फायदा असा होईल की जवळच्या व्यक्तींकडून कर्ज घेऊन तुम्ही व्याजाची आव्हाने तर टाळालच पण थोडी बचतही होईल. यानंतर, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कर्जाची परतफेड करू शकता. जवळच्यांचे ऋण लवकरात लवकर फेडले जावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

दुसरा मार्ग असा आहे, की अनेक वेळा तुमच्या आजूबाजूचे लोक कर्ज मिळवू शकत नाहीत किंवा कर्ज मागायला कचरतात. अशा परिस्थितीत तुम्ही बॅंकेशी (Bank) संपर्क साधावा. तुमच्याकडे एक किंवा अधिक क्रेडिट कार्ड असल्यास, त्याचे निराकरण करण्याबद्दल बॅंकेशी बोला. री-स्ट्रक्चर प्लॅन (Re-Structure Plan) अंतर्गत तुमचे क्रेडिट कार्ड पेमेंट केले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत तुम्ही क्रेडिट कार्डच्या थकबाकीच्या परतफेडीसाठी कालावधी वाढवू किंवा बदलू शकता.

क्रेडिट कार्डची देय रक्कम फेडण्यासाठी परवडणाऱ्या व्याज दराने वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणे हा एक मार्ग आहे. प्रथमदर्शनी, एका कर्जातून बाहेर पडून दुसऱ्या कर्जात अडकल्यासारखे वाटू शकते, परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डचे व्याजदर आणि विलंब शुल्क आदींवर नजर टाकली तर तो एक फायदेशीर सौदा असेल.

क्रेडिट कार्ड कर्जाच्या जाळ्यात अडकलात? जाणून घ्या बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग
SBI Alert : शनिवारी बंद राहतील इंटरनेट बॅंकिंग, YONO, UPI सुविधा

जर क्रेडिट कार्डवर खूप मोठे कर्ज असेल तर खर्चावर देखील नियंत्रण ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवून बचत होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त थकबाकी भरण्यास सक्षम असाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.