Share Market: गेल्या काही वर्षात मल्टीबॅगर शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. टायटनच्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात तुम्ही वाचल्या असतील. पण टायटनपेक्षाही चांगली वाढ एका शेअरमध्ये दिसून आली आहे. ज्याने गुंतवणुकदारांना मालामाल तर केलंच पण या शेअरमध्ये आणखी वाढ दिसून येईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आम्ही पीसी ज्वेलर्सबाबत (PC Jeweller) बोलत आहोत.
गेल्या सहा महिन्यांत बीएसईवर पीसी ज्वेलरचे (PC Jeweller) शेअर्स सुमारे 298.57 टक्क्यांनी वधारले आहेत. बीएसईवर त्याचे शेअर्स 97.65 च्या किमतीवर आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याची किंमत 24.50 रुपये होती, म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास चौपट वाढ झाली आहे. दुसरीकडे, टायटनबद्दल बोलायचे झाल्यास, सहा महिन्यांत हा शेअर केवळ 9.70 टक्के मजबूत झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याचे शेअर्स 2489.10 च्या किमतीवर होते आणि आता ते बीएसईवर ते 2,730.50 रुपयांवर आहे.
चालू आर्थिक वर्षाची पहिली तिमाही पीसी ज्वेलर्ससाठी (PC Jeweller) उत्कृष्ट होती. कंपनीला जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाहीत 179.01 कोटी रुपयांचा तोटा झाला होता पण पुढच्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून 2022 मध्ये 59.99 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. तर तिमाही आधारावर त्याचा महसूल एप्रिल-जून 2022 मध्ये 168.99 कोटींवरून रु. 521.15 कोटी झाला आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.