ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स बनवणारी कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड (Samvardhana Motherson International Ltd) शुक्रवारी बोनस शेअर्स जारी करण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली. संवर्धन मदरसनने गेल्या 10 वर्षांत सहाव्यांदा आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स जारी केले आहेत. कंपनीने प्रत्येक वेळी 1:2 च्या प्रमाणात बोनस दिला आहे. अलीकडील बोनस इश्यूच्या घोषणेपूर्वी, कंपनीने ऑक्टोबर 2018, जुलै 2017, जुलै 2015, डिसेंबर 2013 आणि ऑक्टोबर 2012 मध्ये 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स घोषित केले आहेत.
मदरसन ग्रुप ऑटोमोटिव्ह आणि ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीतील लीडिंग कंपोनंट बनवणारी कंपनी आहे. ग्रुपच्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेडचे (MSSL) नाव बदलून संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड (SAMIL) करण्यात आले आहे.
23 वर्षांत 98,000% रिटर्न
संवर्धन मदरसन ही शेअर बाजारातील काही मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी गेल्या दोन दशकांत आपल्या गुंतवणूकदारांचे भांडवल हजारो पटींनी वाढवून त्यांना कोट्यधीश बनवले आहे. एनएसईवर संवर्धन मदरसनचा शेअर शुक्रवारी 118.30 रुपयांवर बंद झाला. पण, 23 वर्षांपूर्वी, 1 जानेवारी 1999 रोजी, जेव्हा संवर्धन मदरसनच्या स्टॉकने एनएसईवर ट्रेडींग सुरू केले तेव्हा त्याची किंमत फक्त 12 पैसे होती, हो तुम्ही बरोबर वाचताय, केवळ 12 पैसे, तेव्हापासून, कंपनीने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 98,483.33 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे.
एखाद्या गुंतवणूकदाराने 23 वर्षांपूर्वी 1 जानेवारी 1999 रोजी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता त्याचे 9.85 कोटी रुपये झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी केवळ 11 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 1 कोटी 8 लाख रुपये झाले असते.
जून 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत संवर्धन मदरसनचा निव्वळ नफा 51.24% ने घटून 141.22 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या जून 2021 च्या तिमाहीत 289.63 कोटी रुपये होता. त्याच वेळी, कंपनीची निव्वळ विक्री जून 2022 च्या तिमाहीत 9.02% ने वाढून 17,614.71 कोटी झाली. तर गेल्या वर्षीच्या जून 2021 च्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 16,157.35 कोटी रुपये होती.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुं
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.