येत्या काळात या 2 मेटल शेअर्समध्ये दिसेल मजबूत तेजी, आताच खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

येत्या काळात मेटलला जोरदार मागणी असेल असा विश्वास ब्रोकरेज हाऊस एडलवाईसला वाटत आहे
Share Market
Share Market Sakal
Updated on

कोविडमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर चीनमध्ये पुन्हा एकदा औद्योगिक उपक्रम सुरू होताना दिसत आहेत. चीनमधील बांधकाम क्षेत्र पुन्हा एकदा तेजीत असल्याचे दिसून येत आहे.

येत्या काळात मेटलला जोरदार मागणी असेल असा विश्वास ब्रोकरेज हाऊस एडलवाईसला वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी जेएसपीएल (JSPL) आणि टाटा स्टील (Tata Steel) या दोन मेटल स्टॉक्सबाबत एडलवाईसला तेजीचा विश्वास आहे.

Share Market
'रिलायन्स रिटेल' मध्ये 1.5 लाख नवीन नोकऱ्या

एडलवाईसने जेएसपीएलसाठी 637 रुपयांचे टारगेट दिले आहे. त्याचबरोबर टाटा स्टीलसाठी 1755 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. हे दोघेही शेअर्स आयात केलेल्या कोकिंग कोळशावर तुलनेने कमी अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचा नफा आणि मार्जिन पुढेही मजबूत राहील असा एडलवाईसचा विश्वास आहे.

Share Market
देशात सर्वात महाग पेट्रोल विकलं जातंय महाराष्ट्रात, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

FY2023 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे देशांतर्गत मार्जिन FY2022 च्या चौथ्या तिमाहीतील मार्जिनपेक्षा चांगले असेल असे टाटा स्टीलचे निकाल सादर करताना मॅनेजमेंटने म्हटले होते. रियलायझेशन वाढल्यामुळे कोकिंग कोळशाच्या वाढीचा परिणाम संपेल असेही ते म्हणाले होते.

शांघाय म्युनिसिपल सरकारने बांधकाम विकासाशी संबंधित प्रकल्पांच्या मंजुरीची यादी जारी केली आहे. औद्योगिक उपक्रम सुरू करण्यास दिलेली परवानगी हे मेटल सेक्टरसाठी चांगले लक्षण आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन उठवल्यानंतर, चीनमध्ये पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करणार आहोत, ज्यामुळे मेटल सेक्टरला फायदा होईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.