बिग बुल्सनी लावलेत बक्कळ पैसे, रॉकेट सारखे पळालेत 'हे' शेअर्स; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स ?

share market
share marketsakal
Updated on

राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, डॉली खन्ना आणि आशीष कचोलियां यांसारख्या दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलियोची चर्चा कायम होते. या गुंतवणूकदारांनी एखाद्या शेअरला हात लावला की तो शेअर भरघोस नफा देणारच असे म्हटले जाते. अनेकदा तर असेही झाले आहे की दिग्गज गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकी नंतर ते शेअर्स मल्टीबॅगर झाले. यात टायटन कंपनीचे उदाहरण बघू शकतो, ज्यात राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणूकीनंतर शेअर मध्ये प्रचंड वाढ बघायला मिळाली. (theses tocks of rakesh jhunjhunwala and dolly khanna, Ashish Kacholia, Radhakishan Damani gave more than 100 pc return in just 6 months)

मागच्या मार्च तिमाहीत या मार्केट गुरुंनी काही शेअर्सच्या पोर्टफोलियोचा समावेश केला होता. आणि त्याच शेअर्समध्ये वाढ बघायला मिळाली. फक्त 6 महिन्यात त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. आज अशाच काही शेअर्स बद्दल आम्ही माहिती देणार आहोत.

share market
दिवाळीत 'किती' होतील सोन्याचे दर, दिग्गजांनी दिलेत मोठे टार्गेट्स

Jubilant Ingrevia Ltd - यावर्षी परतावा : 94%

राकेश झुनझुनवालांनी मार्च तिमाहीत Jubilant Ingrevia Ltd ला आपल्या पोर्टफोलियोमध्ये समाविष्ट केले होते आणि कंपनीत 6.3 टक्के भागीदारी खरेदी केली. त्यांच्याजवळ कंपनीचे 1,00,20,000 शेअर्स आहेत, ज्यांची किंमत 519 कोटीच्या आसपास आहे.

Garware Hi-Tech Films - यावर्षी परतावा 114%

Garware Hi-Tech Films मध्ये आशीष कचोलियांनी मार्च तिमाहीत गुंतवणूक केली होती. कंपनीमध्ये त्यांची 2 टक्के भागीदारी आहे. त्यांच्याजवळ 42 कोटी किमतीचे 4,72,521 शेअर्स आहेत.

share market
टेलिकॉम उद्योग प्रचंड दबावात, सेवांचे दर वाढविणे आवश्यक- सुनील मित्तल

Neuland Laboratories Ltd. - यावर्षी रिटर्न: 100%

डॉली खन्ना यांनी जानेवारीपासून मार्च तिमाहीत Neuland Laboratories चे 1,61,336 शेअर्स खरेदी केले. त्यांची सध्याची व्हॅल्यू 35 कोटी रुपये आहे. त्यांची कंपनीमध्ये 1.3 टक्के भागीदारी आहे.

Phillips Carbon Black Ltd. - परतवा : 29%

आशीष कचोलियांनी मार्च तिमाहीत कंपनीत 1.5 टक्के भागीदारी खरेदी केली. त्यांच्याजवळ कंपनीचे 25,02,495 शेअर्स आहेत. ज्याची सध्याची व्हॅल्यू, 57 कोटी रुपये आहे.

share market
डेटा विश्लेषणातून पर्यटन व हाॅटेल व्यवसाय अनलाॅक करून देणारी स्टार्टअप अपस्विंग

Mangalore Chemicals & Fertilizers - यावर्षी परतावा : 74%

या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांनी मार्च तिमाहीत 1.7 टक्के भागीदारी खरेदी केली होती. त्यांच्याजवळ या कंपनीचे 17 कोटी रुपयांचे 20,22,610 शेअर्स आहेत.

Fortis Healthcare Ltd - यावर्षी परतावा : 59%

राकेश झुनझुनवालांनी Fortis Healthcare मध्ये मार्च तिमाहीच्या वेळी 0.3 टक्के भागीदारी वाढवून 4.3 टक्के इतकी केली होती. त्यांच्या जवळ 806 कोटी व्हॅल्यूचे 3,25,50,000 शेअर्स आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबतचर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.