100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या 'या' शेअरमध्ये मिळेल चांगला परतावा

गेल्या एका वर्षात स्टॉक 48 टक्क्यांनी वाढला आहे. पोस्ट कोविड हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये चांगली रिकव्हरी होत आहे.
Share Market Updates | Stock Market News
Share Market Updates | Stock Market Newssakal
Updated on

प्रवास आणि पर्यटन अर्थात ट्रॅव्हल्स अँड टुरिझम सेक्टरमध्ये सध्या चांगली रिकव्हरी दिसून येत आहे. याचा फायदा या क्षेत्रातल्या कंपन्याना होताना दिसत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्या सज्ज आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरवर बाय रेटींग दिले आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक 48 टक्क्यांनी वाढला आहे. पोस्ट कोविड हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये चांगली रिकव्हरी होत आहे.

लेमन ट्री लिमिटेडमध्ये 34 % परतावा

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी लेमन ट्रीला 'बाय' रेटिंग दिले आहे. तसेच, प्रति शेअर टारगेट 86 रुपये दिले आहे. 14 जुलै 2022 रोजी शेअरची किंमत 64.35 रुपयांवर बंद झाली. म्हणजेच या किमतीतून, गुंतवणूकदारांना 34 टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो. लेमन ट्री लिमिटेड (Lemon Tree Limited) देशांतर्गत हॉस्पिटलिटी इंडस्‍ट्रीमधून निर्माण होणाऱ्या संधींचा फायदा घेण्यास तयार आहे. कोविड 19 महामारीनंतर हॉटेल सुरू करण्याचे काम रखडले होते. आता मागणी झपाट्याने वाढत आहे. याचा फायदा कंपनीला होईल. याशिवाय मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टद्वारे कंपनीने खोल्यांची संख्या वाढवली आहे.

Share Market Updates | Stock Market News
प्लॉटमध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी; ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’चे ३० जुलैपासून आयोजन

बिझनेस ट्रॅव्हल वाढल्याने लाभ

लेमन ट्री लिमिटेड हॉटेलला बिझनेस ट्रॅव्हलचा लाभ मिळेल. याचे कारण असे की त्याच्या सुमारे 86 टक्के खोल्या व्यवसायाच्या ठिकाणी आहेत. कोविड 19 पूर्वी कंपनीची व्याप्ती 71.5 टक्के होती. म्हणजेच दररोज 4300 खोल्यांपैकी 3100 खोल्यांचे बुकिंग होते. एप्रिल 2022 मध्ये बिझनेस ट्रॅव्हलमधील रिकव्हीरनंतर व्यवसायात सुधारणा झाली आहे. FY22-24E मध्ये लेमन ट्री लिमिटेडचा महसूल/Ebitda 51%/84% च्या CAGR ने वाढून 910 कोटी/450 कोटी होईल अशी शक्यता ब्रोकरेजने व्यक्त केली आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2024 पर्यंत RoE 9.3 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

Share Market Updates | Stock Market News
सोने चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

1 वर्षात 48% परतावा

तुम्ही लेमन ट्री लिमिटेडचा रिटर्न चार्ट बघितला तर, गेल्या एका वर्षात आतापर्यंत स्टॉकमध्ये सुमारे 48 टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी, या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना शेअरमध्ये सुमारे 33 टक्के परतावा मिळाला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 71.45 रुपये होता आणि नीचांक 36 रुपये होता. लेमन ट्री लिमिटेडने आर्थिक वर्ष 2021 मध्ये 1914 रॉक्ससह 13 टॉडलर हॉटेल्स चालवली. लेमन ट्री लिमिटेड मुंबईत लवकरच 669 खोल्या असलेले त्यांचे सर्वात मोठे हॉटेल मुंबईत बांधत आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये ते सुरू होण्याची शक्यता आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.