Multibagger Stock | 2022 मध्ये 'हे' 3 स्टॉक्स ठरु शकतात मल्टीबॅगर

काय सांगत आहेत तज्ज्ञ ऐका
Multibaggers
MultibaggersTeam eSakal
Updated on
Summary

कारण स्टॉकमध्ये कमी लिक्विडिटीमुळे अस्थिरता निर्माण होते.

वर्ष 2021 मध्ये अनेक पेनी स्टॉक मल्टीबॅगर (Multibagger) ठरले. तज्ज्ञांच्या मते, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक (Investment) करणे धोकादायक आहे. कारण स्टॉकमध्ये कमी लिक्विडिटीमुळे अस्थिरता निर्माण होते. पण जर एखाद्या लहान कंपनीचे फंडा मेंटल (Funda mantle) मजबूत असतील, तर पेनी स्टॉकमध्ये (Penny stock) गुंतवणूक केल्यास जास्त परतावा (Refund) मिळू शकतो.

Multibaggers
2022 मध्ये धमाका उडवणारा मल्टीबॅगर स्टॉक तुमच्याकडे आहे का?

चॉईस ब्रोकिंगच्या सुमीत बगाडिया यांनी 3 पेनी स्टॉक सुचवले आहेत जे मल्टीबॅगर परतावा देऊ शकतात:

सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy) : मंथली चार्टवर, सुझलॉन एनर्जी स्टॉकने पाच महिन्यांचा ब्रेकआउट दिला आहे आणि जुलै 2021 मध्ये तयार केलेल्या 9.45 रुपयांच्या पूर्वीच्या उच्चांकाच्यावर राहिला आहे. सुझलॉन एनर्जीमध्ये 10 रुपये किंवा 8 रुपयांवर गुंतवणूक करत 15 आणि 20 रुपयांसाठी टारगेट ठेवण्याचा सल्ला बगाडियांनी दिला. त्याची सपोर्ट लेव्हल 6 रुपयांवर आहे, ज्यावर स्टॉपलॉस ठेवता येईल असा सल्ला त्यांनी दिला.

आयएफसीआय (IFCI) : मंथली चार्टवर, आयएफसीआय (IFCI) स्टॉकने सहा महिन्यांचे कंसोलिडेशन ब्रेकआउट दिला आहे. आता 16 रुपये 40 पैशांच्या आधीच्या उच्च पातळीवर गेला आहे. IFCI शेअर्समध्ये सध्या 25 ते 30 रुपयांचे टारगेट दिसत आहे, त्यामुळे 16 किंवा 14 रुपयांवर हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. 11 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा असेही ते म्हणाले.

Multibaggers
यावर्षी 'या' मल्टीबॅगर शेअरने दिला 188 टक्के परतावा!

व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) : मंथली चार्टवर व्होडाफोन - आयडियाच्या शेअर्सने 13.50 रुपयांचा रझिस्टंस लेव्हलचा ब्रेकआउट दिला आहे. डेली चार्टवर, सिमिट्रिकल ट्रायांगल लाइन फॉर्मेशनवर ब्रेकआउट दिले आहे, जो येत्या काळात तेजीचा संकेत देत आहे.

हे शेअर्स 14 किंवा 13 रुपयांवर खरेदी करा असे बागडिया म्हणाले. येत्या काळात यात 20 ते 25 रुपयांचे टारगेट दिसत असल्याची माहिती त्यांनी दिली. तर 10 रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्लाही दिला आहे. यावर्षी 5G रोलआउटनंतर त्यात 28 ते 30 रुपयांची पातळी दिसून येऊ शकते असेही ते म्हणाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.