Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण, जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

सणासुदीचा काळ संपला तरीही सोने-चांदी खरेदीची संधी आहे. आज रुपया मजबूत स्थितीत आहे आणि परदेशी बाजारातून मिळालेल्या संकेतानुसार सोन्या चांदीच्या किंमती घसरल्या आहेत.
Gold rate
Gold rateSakal
Updated on

सणासुदीचा काळ संपला तरीही सोने-चांदी खरेदीची संधी आहे. आज रुपया मजबूत स्थितीत आहे आणि परदेशी बाजारातून मिळालेल्या संकेतानुसार सोन्या चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. आजच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव ५१ हजार रुपयांच्या जवळ आला आहे. तर चांदी 58 हजारांच्या जवळ आली आहे. काल परदेशी बाजारात सोन्याने दोन आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली होती. मात्र, आज विदेशी बाजारातील भावात घसरण झाली असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला आहे.

Gold rate
RBI: दहशतवाद्यांच्या खात्यांची माहिती द्या; RBI ने दिल्या ‘या’ बँकांना सूचना

सोन्या-चांदीचे भाव कुठे पोहोचले

रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाल्यामुळे गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 101 रुपयांनी घसरून 51,024 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. त्यामुळे मागील व्यवहारात सोने 51,125 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. दिल्लीत चांदीचा भाव 334 रुपयांनी घसरून 58,323 रुपयांवर आला. परकीय चलन बाजारात गुरुवारी डॉलर उच्चांकाच्या खाली घसरला होता. त्यामुळे सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की,  काल अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. आणि सोन्याने 1675 ची पातळी गाठली. मात्र, आज त्या वाढीचे रुपांतर घसरणीत झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.