आज रतन टाटांचा वाढदिवस! जाणून घ्या त्यांच्याविषयी 'या' दहा गोष्टी

आज रतन टाटांचा वाढदिवस! जाणून घ्या त्यांच्याविषयी 'या' दहा गोष्टी
रतन टाटा
रतन टाटाSakal
Updated on
Summary

रतन टाटा यांचा जन्म आजपासून 83 वर्षांपूर्वी 28 डिसेंबर 1937 रोजी सुरत येथे झाला.

रतन टाटा (Ratan Tata) यांचा जन्म आजपासून 83 वर्षांपूर्वी 28 डिसेंबर 1937 रोजी सुरत (Surat) येथे झाला होता. आज रतन टाटा यांचा वाढदिवस आहे. रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना नवजबाई टाटा यांनी त्यांचे पती रतनजी टाटा यांच्या निधनानंतर दत्तक घेतले होते. आज, रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त (Ratan Tata's Birthday) त्यांचे काही प्रेरणादायी किस्से जाणून घ्या. (Today is Ratan Tata's birthday, here are ten things to know about him)

रतन टाटा
वृद्ध पालकांचा आरोग्य विमा घेतला नाही तरी मिळेल कर सवलतीचा लाभ!

रतन टाटांबद्दल जाणून घ्या या दहा गोष्टी

  • रतन टाटा हे टाटा समूहाचे (Tata Group) संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) यांचे दत्तक नातू नवल टाटा (Naval Tata) यांचे पुत्र आहेत.

  • टाटा हे गुजरातच्या (Gujarat) भांडवलदार कुटुंबातील होते, परंतु असे असूनही त्यांचे बालपण चांगले गेले नाही आणि याचे कारण म्हणजे त्यांचे पालक त्यांच्यासोबत राहात नव्हते. टाटा खूप लहान होते जेव्हा त्यांचे पालक मतभेदांमुळे विभक्त राहू लागले.

  • टाटांचे संगोपन त्यांच्या आजीने केले आणि त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला (Mumbai) गेले.

  • मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर, टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठातून (Cornell University) आर्किटेक्‍चरमध्ये (Architecture) बीएस आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ऍडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम (Advanced Management Program) केले.

  • रतन टाटा हे टाटा समूहाचे 5 वे अध्यक्ष बनले. विशेष म्हणजे, टाटा समूहात केवळ 6 चेअरमन आहेत, त्यापैकी 2 टाटा कुटुंबातील नाहीत. टाटा समूह ही देशातील सर्वात विश्वासार्ह कंपनी मानली जाते.

रतन टाटा
नवीन आर्थिक वर्षात 15 मिनिटे जास्त काम केल्यास मिळणार ओव्हरटाईम?
  • टाटा कंपनी वादात सापडली जेव्हा त्यांनी सहावे चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांना कंपनीतून काढून टाकले.

  • सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर रतन टाटा यांनी काही काळ अंतरिम अध्यक्ष म्हणून काम केले.

  • देशात पहिल्यांदा मीठ (Salt) बनवण्याचे काम 1927 मध्ये गुजरातमधील ओखा येथे सुरू झाले, जे जेआरडी टाटा यांनी 1938 मध्ये विकत घेतले आणि याबरोबरच टाटा सॉल्टची सुरुवात झाली.

  • 2008 साली रतन टाटा यांनी नॅनो (Nano Car) ही जगातील सर्वात स्वस्त कार एक लाख रुपये किमतीची सादर केली. खरे तर टाटांनी हे स्वप्न 1997 मध्येच पाहिले होते, जेणेकरून सामान्य माणसाला केवळ 1 लाख रुपयांमध्ये कारचे स्वप्न पूर्ण करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()