Best 10 Stock to Buy : बाजाराची सुरूवात मंगळवारी चांगली झाली पण कमकुवत जागतिक संकेतांमध्ये सर्व नफा गमावला. यूएसमधील वाढती ट्रेझरी यील्ड, संयुक्त अरब अमिरातीवरील हुथी बंडखोरांच्या ड्रोन हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबद्दलची चिंता आणि त्यानंतर तेलाच्या किमतीत आलेली तेजी या सर्वांमुळे बाजारातील (Share Market) वातावरण खराब झाले. त्यामुळेच बेंचमार्क निर्देशांक 1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. निफ्टी 18200 च्या खाली घसरला. दुसरीकडे, जवळपास सर्वच क्षेत्रातील विक्रीमुळे सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला. (Today's list of top 10 stocks that will make you wealthy)
सेन्सेक्स (Sensex) 554.05 अंकांनी म्हणजेच 0.90 टक्क्यांनी घसरून 60,754.86 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 195.05 अंकांनी अर्थात 1.07 टक्क्यांनी घसरून 18,113.05 वर बंद झाला.
निफ्टीने डेली स्केलवर बियरिश इनगल्फिंग पॅटर्न तयार केला आणि गेल्या 4 ट्रेडिंग सत्रातील सर्व नफा गमावल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चंदन तापडिया म्हणाले. आता 18,250 आणि 18,350 च्या झोनमध्ये जाण्यासाठी निफ्टीला 18081 च्या वर राहावे लागेल. खाली 18000 आणि 17900 वर सपोर्ट असल्याचेही ते म्हणाले.
तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, निफ्टीने बियरिश इन्गल्फिंग पॅटर्न तयार केला आहे जो निर्देशांकात आणखी काही घसरण दर्शवत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे सचिन गुप्ता म्हणाले. RSI आणि Stochastic सारखे मोमेंटम इंडिकेटर ओवरबॉट टेरीटरीतून बाहेर गेले आहेत, म्हणजेच येत्या काही दिवसांत बाजाराला उतरती कळा येण्याची शक्यता आहे. शिवाय प्रत्येक घसरणीमध्ये, लाँग टर्म साठी चांगले शेअर्स खरेदी केले पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला.
सध्या निफ्टीला 18000 वर सपोर्ट आणि 18300 वर रेझिस्टन्स दिसत आहे. जर निफ्टी 18300 च्या रेझिस्टन्स तोडून वर जाण्यात यशस्वी झाला तर तो 18500-18600 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, 17800 च्या स्तरावर बँक निफ्टीला सपोर्ट आणि 18600 वर रेझिस्टन्स आहे.
मारुती (MARUTI)
टाटा कंझ्युमर्स (TATACONSUME)
अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
ग्रासिम (GRASIM)
रॅमको सिमेंट्स (RAMCOCEM)
भारत हेवी इलेक्ट्रिकल (BHEL)
ग्लेनमार्क (GLENMARK)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
आयआरसीटीसी (IRCTC)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.