टोकियो ऑलिंपिक विजेत्यांना जेएसडब्ल्यूची अडीच कोटींची बक्षिसे

Neeraj Chopra
Neeraj ChopraSakal media
Updated on

मुंबई : नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympic) पदक मिळविणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी (Indian medalist players) जेएसडब्ल्यू ग्रूप (jsw group) ने अडीच कोटी रुपयांची रोख बक्षिसे (gifts) जाहीर केली आहेत. यात भालाफेकीत सुवर्णपदक मिळविणाऱ्या नीरज चोप्रा (neeraj chopra) याला एक कोटी रुपये तर त्याचे प्रशिक्षक (coach) व फिजिओथेरेपीस्ट यांना प्रत्येकी दहा लाख रुपये देऊन त्यांचा सन्मान केला जाईल.

कुस्तीगीर बजरंग पुनीयाला पंधरा लाख तर त्याचे प्रशिक्षक व फिजिओथेरेपीस्ट यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जातील. रवी दहियास 20 लाख तर प्रशिक्षक सतपाल सिंह यांनाही पाच लाख रुपये मिळतील. कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला (16 खेळाडू) मुख्य व सहायक प्रशिक्षकांना तसेच फिजिओथेरेपिस्ट ना प्रत्येकी दोन लाख रुपये देऊन गौरविले जाईल.

Neeraj Chopra
मुंबईतील सर्व रेल्वे पोलीस ठाण्यात 'पालघर पॅटर्न' राबविला जाणार - कैसर खालिद

चार अन्य प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनाही प्रत्येकी एक लाख रुपये मिळतील. कांस्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू ला पंधरा लाख तर तिच्या प्रशिक्षकांना पाच लाख रुपये दिले जातील. कांस्य पदकविजेती मुष्टियोद्धा लोवलीना बोर्गोहिन ला पंधरा लाख व तिच्या दोन प्रशिक्षकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देऊन सन्मान केला जाईल. तर वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या मीराबाई चानू हिला वीस लाख रुपये तर तिचे प्रशिक्षक विजय शर्मा यांना पाच लाख रुपये देऊन गौरविले जाईल. जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स इस्टिट्यूटचे संस्थापक पार्थ जिंदाल यांनी ही माहिती दिली. भारताला यापुढेही असे अनेक क्रीडापटू घडविण्याची संधी आहे, असेही ते यानिमित्ताने म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.