वर्कआऊट अॅट होम ट्रेंडला बळ देणारी फिटनेस स्टार्टअप 'ट्रेड'

Trade Startup
Trade Startupsakal
Updated on

दर महिन्याच्या एक तारखेला किंवा अशाच कुठल्यातरी 'मुहूर्ता'वर व्यायाम (Work out at Home) सुरू करणारे किंवा तसा 'निश्चय' करणारे अनेक आरंभशूर आहेत. काही दिवस हा उत्साह राहतो आणि त्यानंतर कंटाळा किंवा अन्य कोणत्यातरी अतिमहत्त्वाच्या 'नोकरी' किंवा 'अभ्यासा'च्या कारणास्तव हा व्यायाम थांबतो.. तो थांबतोच! पुन्हा पूर्वीसारखी प्रोत्साहनाची पातळी गाठायला मग 'न्यू ईयर' उजाडतं!

पण जर तुम्हाला घरच्या घरी मनोरंजनात्मक पद्धतीने वर्कआऊट करण्याची संधी मिळाली तर? ट्रेनरचे लाईव्ह सेशन, त्यांच्याकडून महत्त्वाचा सल्ला तसेच तुमच्या मित्र-परिवारातील सदस्यांबरोबर स्पर्धात्मक वर्कआऊट करायची संधी आणि फिटनेस संबंधी उपयुक्त माहिती जर तुमच्या व्यायामाच्या मशीनच्या स्क्रीनवरच पाहायला मिळाली तर? या आणि अशा अनेक फिचर्सची जोड देत एका ब्लाॅगर आन्त्रप्रेन्यूअरने ट्रेड (TREAD Startup) नावाचा कनेक्टेड फिटनेस प्लॅटफाॅर्म विकसित केला आहे. (TREAD new startup founded by Dinesh Godara for work out at home)

Trade Startup
काॅलेज ड्राॅपआउट तरुणाची स्टार्टअप करत आहे भारतीय लष्कराचे 'संरक्षण'

ब्लाॅगर ते उद्योजक म्हणून प्रवास

दिनेश गोदारा या तरुणाने ही फिटनेस स्टार्टअप सुरू केली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या दिनेशने बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले. त्यानंतर त्याने एमबीए आणि अॅडव्हान्स्ड डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंगचे शिक्षण घेतले.

बीटेकचे शिक्षण घेत असतानाच त्याने ब्लाॅगिंग सुरू केले आणि 'गुगल अॅडसेन्स'च्या माध्यमातून त्याला आर्थिक उत्पन्नही सुरू झाले. दिनेशने 2013 मध्ये 'वायफाय-स्टडी' नावाचं त्याचं युट्यूब चॅनेल तसेच आॅनलाईन एज्युकेशन आणि करिअर पोर्टल सुरू केले. सुमारे सव्वाकोटी सबस्क्राईबर्स असलेल्या या युट्यूब चॅनेलला एड-टेक युनिकाॅन स्टार्टअप अनअकॅडमीमे आॅक्टोबर 2018 मध्ये विकत घेतले.

एज्युकेशन विषयाच्या युट्यूब चॅनेलच्या अॅक्विझिझननंतर दिनेशने सुमारे दोन वर्ष अनअकॅडमीचा सहसंस्थापक व सीईओ गौरव मुंजाळ याच्याबरोबर काम केले. 'कंटेन्ट-ड्रिव्हन आॅनलाईन कंपनी' अल्पावधीतच कशी वाढवायची याचे धडे दिनेशने गौरवकडून घेतले.

Trade Startup
उत्तम व यशस्‍वी गुंतवणूकीसाठी आपले व्‍यवहार कसे असावेत

लाॅकडाऊनमध्ये सुचली ट्रेडची कल्पना

देशात मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन लागला तेव्हा संपूर्ण आॅफलाईन फिटनेस इंडस्ट्रीवर त्याचा परिणाम झाला. कारण बाहेर पडता येत नसल्यामुळे लोकांनी घरीच व्यायाम करण्यास प्राधान्य दिले. पण मार्च महिन्यातला हा उत्साह एप्रिल व त्यापुढील महिन्यात काही प्रमाणात ओसरला. वर्क फ्राॅम होम याप्रमाणेच वर्कआऊट फ्राॅम होम हा ट्रेंड बऱ्यापैकी सेट झाला होता, पण लोकांना व्यायामासाठी प्रोत्साहित करून काहीतरे नवीन देण्याची सोय जुन्या आॅफलाईन पद्धतीत नव्हती. ही 'संधी' दिनेशमधील उद्योजकाने पाहिली आणि त्यावर काम करायला सुरवात केली. कंटेन्टचा तगडा अनुभव पाठीशी असल्यामुळे फिटनेस इंडस्ट्रीला आॅनलाईन माध्यमातून कसे मनोरंजनात्मक करता येईल याचा विचार दिनेशने सुरू केला.

ट्रेड वन या फ्युचरिस्टिक स्मार्ट इनडोअर सायकलवर (TREAD one futuristic smart indoor cycle) असलेल्या 22 इंची स्क्रीनच्या माध्यमातून दिनेशने फिटेनस कंटेन्ट, लाईव्ह वर्कआऊट सेशन आणि लिडरबोर्ड फाॅर्मॅटमध्ये आपल्या मित्र-कुटुंबियांसोबतची व्यायामाची स्पर्धात्मक तुलना असे फिचर्स उपलब्ध करून दिले आहेत. सायक्लिंगबरोबरच योग, कार्डिओ, स्ट्रेंदनिग आणि कंडिशनिंग वर्कआऊटसह वन-स्टाॅप फिटनेस सोल्यूशन देण्याचा ट्रेड स्टार्टअपचा उद्देश आहे. (TREAD new startup founded by Dinesh Godara for work out at home)

Trade Startup
इनोव्हेशनला चालना देणारी डिफेन्सची 'नवयुक्ती'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.