पत्नीला पैसे ट्रान्सफर केल्यास आयकर विभागाची नोटीस?

Income Tax
Income TaxSakal
Updated on

देशभरात बऱ्याच काळापासून लोकांच्या खरेदीच्या पद्धती बदलत चालल्या आहेत. त्याचा परिणाम पेमेंट प्रक्रिया आणि पर्यायांवरही झालाय. आता लोक ऑनलाईन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंटला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत बहुतेकजण घरखर्चासाठी पत्नीच्या बँक खात्यात दर महिन्याला पैसे ट्रान्सफर करत असतात. तुम्ही पत्नीला दर महिन्याला पैसे ट्रान्सफर केल्यास इन्कम टॅक्स विभागाची नोटीस मिळू शकते का?, असा प्रश्न पडला असेल तर, हा लेख नक्की वाचा.

पतीकडून मिळालेल्या पैशाच्या गुंतवणुकीवर कर

जर तुम्ही घरखर्चासाठी दर महिन्याला पैसे दिले किंवा दिवाळी, धनत्रयोदशी किंवा इतर कोणत्याही विशेष प्रसंगी भेट म्हणून पैसे दिले, तर पत्नीवर आयकर लागू होत नाही. या दोन्ही प्रकारची रक्कम पतीची मिळकत मानली जाईल. यावर पत्नीला कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यामुळे पत्नीला या रकमेसाठी आयकर विभागाकडून कोणतीही नोटीस मिळणार नाही.

मात्र, पत्नीने हे पैसे वारंवार गुंतवले आणि त्यातून उत्पन्न मिळाले, तर नोकरीत असलेल्या भांडवलावरील उत्पन्न करपात्र होईल. गुंतवणुकीवरील उत्पन्नाची गणना पत्नीच्या दर-वर्षाच्या मिळकतीच्या आधारावर केली जाईल. यावर पत्नीला कर भरावा लागेल.

भेटवस्तूमध्ये दिलेल्या पैशावर कर सूट नाही

आयकर कायद्यानुसार, जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाव्यतिरिक्त तुमच्या पत्नीला भेट म्हणून पैसे देत असाल, तर ते कायदेशीररित्या चुकीचे नाही. मात्र, यावर तुम्हाला कोणत्याही कर सवलतीचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही पत्नीला आयकर कायद्यानुसार उत्पन्नाव्यतिरिक्त भेट म्हणून पैसे दिले तर ते तुमचे उत्पन्न मानले जाईल. यावरील कर दायित्वही तुमचेच असेल. वास्तविक, पती/पत्नी हे नातेवाईकांच्या श्रेणीत येतात. अशा परिस्थितीत अशा भेटवस्तू व्यवहारांवर कोणताही कर आकारला जात नाही.

ITR दाखल करण्याची गरज नाही

जर पत्नी पतीच्या मासिक रकमेतून काही पैसे SIP द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये (MFs) गुंतवत असेल, तर तिला या पैशावर इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची गरज नाही. एवढेच नाही तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. या पैशाच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न पतीच्या करपात्र उत्पन्नात जोडले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.