निफ्टीत 23 सप्टेंबरनंतरची सर्वात मोठी वाढ दिसून आली.
सोमवारच्या मोठ्या घसरणीनंतर मंगळवारी बाजारात जोरदार तेजी दिसली. मंगळवारी सेन्सेक्स (Sensex) 874 अंकांनी तर निफ्टी (Nifty) 264 अंकांनी वर होता. बँक निफ्टीने 882 अंकांची मजबूत तेजी दाखवली. मिडकॅप (Midcap) आणि स्मॉलकॅप (Smallcap) शेअर्समध्येही खरेदी झाली. बीएसईच्या सर्व क्षेत्र निर्देशांकांमध्ये खरेदी दिसून आली. मेटल, बँक, रिअल्टी आणि वाहन शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. निफ्टीत 23 सप्टेंबरनंतरची सर्वात मोठी वाढ दिसून आली.
सेन्सेक्स 887 अंकांनी वाढून 57,634 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 264 अंकांनी वाढून 17,177 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 883 अंकांनी वाढून 36,618 वर बंद झाला. मिडकॅप 419 अंकांनी वाढून 30,283 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्सची खरेदी झाली. निफ्टीच्या 50 पैकी 45 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी बँकेचे सर्व 12 शेअर्सची खरेदी झाले.
निफ्टीने (Nifty) डेली स्केलवर बुलीश हरामी कँडल तयार केली आहे. मंगळवारी सर्वच स्तरांतून खरेदी दिसून आली. मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. निफ्टीला 17350 आणि 17500 कडे जाण्यासाठी 17200 च्या वर जावे लागेल. खालच्या बाजूने 17,000 आणि 16,800 वर सपोर्ट आहे.
येत्या काळात अपट्रेंड व्हेव (Uptrend Wave) कायम राहील असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. पण मोठ्या इंट्राडे नफ्यामुळे बाजार 17075-17280 च्या रेंजमध्ये कंसोलीडेट (Consolidate)होऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17,075 च्या खाली गेला तर त्यात यामध्ये कमजोरी येऊ शकते. गुंतवणूकदार एमपीसीच्या बैठकीच्या निकालांवर लक्ष ठेवतील असे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम यांचे म्हणाले. निफ्टीला 16,800 वर सपोर्ट आणि 17,300 वर रेझिस्टन्स (Resistance) आहे. त्याच वेळी, बँक निफ्टीला 35700 वर सपोर्ट आणि 37,000 वर रेझिस्टन्स आहे.
निफ्टीला 17,000 वर सपोर्ट आणि 17300 ला रेझिस्टन्स असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. जर निफ्टीने 17300 ची पातळी ओलांडली तर यामध्ये 17,500-17,700 ची लेव्हल पाहू शकतो. बँक निफ्टीला 35,500 वर सपोर्ट आणि 37,000 वर रेझिस्टन्स आहे असेही ते म्हणाले.
- हिंदाल्को (HINDALCO)
- टाटा स्टील (TATASTEEL)
- ॲक्सिस बँक (AXISBANK)
- आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
- टाटा मोटर्स (TATAMOTORS)
- टोरंट पॉवर (TORNTPOWER)
- कॅनरा बँक (CANBK)
- मन्नपुरम जनरल फायनान्स अँड लिझिंग (MANAPPURAM)
- बाटा इंडिया (BATAINDIA)
- अशोक लेलँड (ASHOKLEY)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.