Share Market : 'या' बँकेचे मार्केट व्हॅल्यू 50,000 कोटीच्या पार; एका महिन्यात शेअर्समध्ये 60% वाढ...

ज्यांनी गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूक केली आहे त्यांचे पैसे दुप्पट केले आहेत.
shares
sharesgoogle
Updated on

युनियन बँक ऑफ इंडियाची (Union Bank of India) मार्केट व्हॅल्यू शुक्रवारी 50,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान, बँकेचे शेअर्स सुमारे 5.5% वाढून 74.45 रुपयांवर पोहोचले, जे गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. युनियन बँकेने गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबरला सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. यानंतर, गेल्या एका महिन्यात बँकेचे शेअर्स सुमारे 60% वाढले.

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

सप्टेंबरच्या तिमाहीत युनियन बँकेचा नफा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,526 कोटींच्या तुलनेत 21.07 टक्क्यांनी वाढून 1,848 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, बँकेचे नेट इंटरेस्ट इन्कम (NII) सप्टेंबर तिमाहीत 21.61 टक्क्यांनी वाढून 8,305 रुपये झाला. सप्टेंबर तिमाहीत बँकेचे नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) 2.95 टक्के होता.

या काळात बँकेचे नॉन-इंटरेस्ट इन्कम 17.65 टक्क्यांनी घसरून 3,276 कोटी रुपये झाले. युनियन बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सप्टेंबरच्या तिमाहीत सुधारली आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए सप्टेंबर तिमाहीत 8.45 टक्‍क्‍यांवर घसरला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 12.64 टक्‍क्‍यांवर होता. बँकेचा नेटएनपीए सप्टेंबरच्या तिमाहीत 2.64 टक्क्यांवर घसरला असून तो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4.61 कोटी रुपये होता.

shares
Gautam Adani : 'पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकास करत आहे'

यासह युनियन बँक आता मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सामील झाली आहे ज्यांनी गेल्या 6 महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. युनियन बँकेने गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 108% परतावा दिला आहे. त्याच वेळी, या वर्षाच्या सुरुवातीपासून ते सुमारे 67.38% वाढले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.