Budget 2023: सीतारामन ११ वाजता सादर कारणार अर्थसंकल्प; जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

Union Budget 2023  full schedule finance minister nirmala sitharaman will present budget at 11am
Union Budget 2023 full schedule finance minister nirmala sitharaman will present budget at 11am
Updated on

Union Budget 2023 : यंदाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आता अगदी काही तासांत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान अर्थसंकल्प किती वाजता सादर होणार हा प्रश्न बहुतेकांना पडला असेल. तुम्हीही याविषयी संभ्रमात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे...

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आणि नंतर अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. या सर्व गोष्टी ठराविक वेळेत केल्या जातात. अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.

असे असेल अर्थसंकल्पाचे संपूर्ण वेळापत्रक

सकाळी ८.४० वाजता - अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर पडतील आणि नॉर्थ ब्लॉकमधील अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात जातील. अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयातून त्या बजेटची प्रत घेऊन संसदेला रवाना होतील.

सकाळी ९ वाजता - अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ९ वाजता अर्थ मंत्रालयाच्या गेट क्रमांक २ मधून बाहेर पडतील. यानंतर अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि अर्थमंत्र्यांचे बजेटसोबत फोटो सेशन होणार आहे.

Union Budget 2023  full schedule finance minister nirmala sitharaman will present budget at 11am
Budget 2023 : आज सादर होणार अर्थसंकल्प; जाणून घ्या बजेटचा ब्रीफकेस ते मोबाईल App प्रवास

सकाळी ९.२५ वाजता - अर्थमंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पावर राष्ट्रपतींची मंजुरी घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात जातील. तेथे ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. यादरम्यान राष्ट्रपती मुर्मू अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी देतील.

सकाळी १० वाजता - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी घेतल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट घेऊन संसदेत पोहोचतील.

सकाळी १०.१० वाजता - संसदेत पोहोचल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाकडून अधिकृत मंजुरी घेण्यात येणार आहे.

Union Budget 2023  full schedule finance minister nirmala sitharaman will present budget at 11am
Budget Session 2023 : भारताच्या बजेटकडे संपूर्ण जगाचे लक्ष, अर्थसंकल्प अधिवेशनाआधी PM मोदींची ललकार

सकाळी ११ वाजता - अर्थमंत्री सकाळी ११ वाजता संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील आणि त्यावर बोलण्यास सुरुवात करतील.

दुपारी ३ वाजता - संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये आधी ती अर्थसंकल्पातील घोषणांवरील मुख्य मुद्दे सांगणार आहेत. तसेच यानंतर त्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()