Union Budget 2023: ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! 'या' योजनेची गुंतवणूक मर्यादा वाढली; जाणून घ्या डिटेल्स

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा
Senior-Citizen-Savings-Scheme
Senior-Citizen-Savings-Scheme
Updated on

Union Budget 2023: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत योजनेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली. त्यानुसार, सिनिअर सिटिझन सेविंग स्कीममध्ये (SCSS) पैसे गुंतवण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. (Union Budget 2023 Good News For Senior Citizens FM Sitharaman Increases Saving Scheme Limit)

Senior-Citizen-Savings-Scheme
Fadnavis on Budget: सर्वजणहिताय! अर्थमंत्री फडणवीसांनी केलं एकाच वाक्यात बजेटचं वर्णन

सीतारामण घोषणा करताना म्हणाल्या, सिनिअर सिटिझन सेविंग स्कीममध्ये (SCSS) जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली असून ती १५ लाखांवरुन ३० लाख रुपये करण्यात आलं आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त ठेवीची मर्यादा मंथली इन्कम अकाऊंट स्कीमची मर्यादा ४.५ लाखांवरुन ९ लाख रुपये करण्यात आली आहे. तर जॉईन्ट अकाऊंटसाठी ९ लाखांवरुन १५ लाख रुपये करण्यात आली आहे.

Senior-Citizen-Savings-Scheme
Union Budget 2023: मध्यमवर्गीयांसाठी खूशखबर! आता सात लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा

सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) काय आहे?

SCSS ही केंद्र शासित पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना असून या योजनेची सुरुवात सन २००४ मध्ये झाली. निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरुपी आणि सुरक्षित पैसे मिळवून देणारी ही योजना आहे. ही खूपच लोकप्रिय आणि सध्याची सर्वात किफायतशीर योजना आहे.

SCSS ची वैशिष्ट्ये काय?

सरकार दर तिमाहीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदरात बदल करते. जे मुख्यत्वे बाजारातील प्रचलित दर, महागाई आणि इतर घटकांवर अवलंबून असते. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीच्यावेळी घोषित केलेला व्याजदर निश्चित असतो आणि संपूर्ण मुदतीमध्ये बदलत नाही.

या योजनेसाठी किमान १,००० रुपयांची ठेवी ठेवता येतात तर जास्तीत जास्त १५ लाख रुपये ठेवता येतात. या मर्यादेत आता वाढ करुन ती ३० लाख रुपयांपर्यंत ठेवता येणार आहे. या योजनेचा मुदतपूर्ती कालावधी ५ वर्षे आहे. ती आणखी ३ वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. गुंतवणूकदाराला खाते बंद करून मुदतपूर्व रक्कम काढायची असेल तर तो खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर ही प्रक्रिया करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.