Nirmala Sitharaman Husband : कोण आहेत अर्थमंत्र्यांचे यजमान ज्यांनी मंदीसाठी थेट मोदींनाच जबाबदार धरलं होतं

निर्मला सीतारमन यांचे यजमान कोण आहेत ?
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharamansakal
Updated on

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता संसदेत मोदी सरकारचा 9वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा निर्मला सीतारमनकडे आज असेल. निर्मला सिमारमनविषयी तुम्हाला माहिती असेल पण त्यांच्या नवऱ्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का?

निर्मला सीतारमन यांच्या यजमानानी एकेवेळी मंदीसाठी थेट मोदींनाच जबाबदार धरलं होतं. कोण आहेत त्यांचे यजमान? आज आपण त्यांच्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Union Budget 2023 who is finance minister Nirmala Sitharaman spouse Husband read story)

परकला प्रभाकर कोण?

परकला प्रभाकर हे अर्थ-राजकीय स्तंभलेखक आहे. प्रभाकर हे आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागार आहेत. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचाही त्यांना चांगला अभ्यास आहे. अनेकदा देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन त्यांनी मोदींना खडे बोल सुनावले. त्यावरुन त्यांना बरीच टीकेलाही सामोरे जावे लागले.

खुद्द अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीनेही आर्थिक मंदीला पंतप्रधान मोदीच जबाबदार ठरवले होते. असं पहिल्यांदाच झालं होतं त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या पतीनेच टीका केल्यामुळे हे प्रकरण बरंच गाजलं होतंं.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman : अहो निर्मला ताई जरा ऐकता का, तुम्ही आता... गृहिणीचे अर्थमंत्र्यांना पत्र

प्रभाकर आर्थिक मंदीवरुन मोदीला काय म्हणाले होते?

 प्रभाकर म्हणाले होते, " नरसिंहराव पंतप्रधान असताना मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक सुधारणा केल्या होत्या आणि देशाची अर्थव्यवस्था रूळावर आली. त्यांच्यापासून मोदी सरकारने काहीतरी शिकायला पाहिजे. अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहे हे मान्य करा आणि केवळ नेहरूंवर टीका करण्याचे सोडून द्या"

Nirmala Sitharaman
Budget 2023 : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

निर्मला सीतारामन आणि परकला प्रभाकर

निर्मला सीतारामन या जेएनयूमध्ये शिकत असताना त्यांची भेट परकला प्रभाकर यांच्याशी झाली होती. परकला प्रभाकर यांच्या कुटुंबात अनेक काँग्रेस नेते होते तर परकला प्रभाकर यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे संपर्क सल्लागार म्हणूनही काम केले. निर्मला यांनी 1986 मध्ये परकला प्रभाकर यांच्याशी लग्न केले आणि त्या लंडनला गेल्या.

1991 मध्ये त्या भारतात परतल्या. निर्मला यांचे पती प्रभाकर आणि कुटुंब काँग्रेसचे समर्थक होते तरीसुद्धा निर्मला सीतारमन यांनी 2006 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()