तुम्हालाही शॉर्ट टर्ममध्ये (Short Term)चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्ही हे स्टॉक खरेदी करू शकता.
स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market)खरेदी करण्यासाठी, तुम्हाला अशा स्टॉकची निवड करणे आवश्यक आहे. त्यामुळेच शेअर बाजार (Share Market) तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक (Stock)निवडला आहे. तुम्हालाही शॉर्ट टर्ममध्ये (Short Term)चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्ही हे स्टॉक खरेदी करू शकता. कारण येत्या काळात हा स्टॉक आऊट परफॉर्म (Out perform)करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संदीप जैन यांनी यूनायटेड ड्रिलिंगचे (United Drilling) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा शेअर जवळपास 420 रुपयांवर ट्रेड करत आहे, पण येत्या काहीच महिन्यात हा शेअर 450 रुपयांची पातळी गाठेल असा विश्वास जैन यांना आहे
कंपनी काय करते ?
यूनायटेड ड्रिलिंग (United Drilling) ही कंपनी ड्रिलिंग टूल्स बनवते आणि ती जगातील आघाडीची उत्पादन कंपनी आहे. यूनायटेड ड्रिलिंग (United Drilling) 1985 पासून कार्यरत आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांत चांगली वाढ नोंदवली असून कंपनीवर शून्य कर्ज आहे. त्याच वेळी, कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी सुमारे 75 टक्के आहे.
यूनायटेड ड्रिलिंग (United Drilling)
- सीएमपी (CMP) - 419.80 रुपये
- टारगेट (Target)- 450 रुपये
- कालावधी (Duration) - 6-9 महीने
सप्टेंबर तिमाहीचे निकाल?
या वर्षी सप्टेंबर तिमाहीत यूनायटेड ड्रिलिंगने (United Drilling) चांगले निकाल सादर केले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 9 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 15 कोटी रुपयांचा नफा झाला.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.