Share Market : येत्या सहा महिन्यात 'हे' शेअर्स देतील दमदार परतावा; तज्ज्ञांचा सल्ला

काही स्टॉक चांगली कामगिरी करतील अशी शक्यता शेअर बाजार तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
share market.
share market.Sakal
Updated on

गेल्या काही दिवसांत आयटी, मेटल, बँकिंगसह सर्वच क्षेत्रांत चांगली खरेदी दिसून येत आहे. बाजारातील सततच्या अस्थिरतेच्या दरम्यान, काही स्टॉक चांगली कामगिरी करतील अशी शक्यता शेअर बाजार तज्ज्ञांनी वर्तवली आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीजचे अध्यक्ष भारत गाला यांनी काही टेक्निकल शेअर्सवर खरेदीचा सल्ला दिला आहे. जय कॉर्प लिमिटेड (JAI CORP LTD) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (Bharat Dynamics Ltd) या दोन शेअर्सवर त्यांनी काय सांगितले ते आज जाणून घेऊयात. पुढील 3-6 महिन्यांसाठी या शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

  • जय कॉर्प लिमिटेड (JAI CORP LTD)

  • सीएमपी (CMP) 190.50 रुपये

  • टारगेट (TARGE) - 225-375 -575 रुपये

  • बाय एरिया (BUY AREA) - (165-152)-141-(130-124) रुपये

  • स्टॉप लॉस - (STOP LOSS) - 114 रुपये

जय कॉर्प लिमिटेड (JAI CORP LTD) शेअरची किंमत एप्रिल 2022 मध्ये 1 रुपया 45 पैशांवरून जानेवारी 2008 मध्ये 1450 रुपयांवर गेली आहे. यादरम्यान, शेअरने एव्हरेजच्या वर ट्रेड केला, पण मग यात सतत प्रॉफिट बुकींग दिसून आली. ऑगस्ट 2013 मध्ये 35.5 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. दरम्यान, शेअरमध्ये तेजी दिसून आली. मात्र ती 300-350 रुपयांच्या प्राइस झोनमध्ये राहिली.

अलीकडे, मंथली चार्टवर या स्टॉकमध्ये सिमेट्रिकल ट्राएंगल ब्रेकआउट आहे. जानेवारी 2008 आणि ऑगस्ट 2022 च्या कनेक्टिंग लाइनवर मंथली प्राइस बार आहे. अलीकडे शेअरले 187 चा उच्चांक गाठला. विल्यम %R, CCI आणि ADX इंडिकेटर्स स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. या लेव्हलवरुन शेअर वाढण्याची शक्यता आहे. त्याचे संभाव्य लक्ष्य 225-375 -575 आहेत. शेअरमध्ये करेक्‍शन असल्यास (165-152)-141-(130-124) पातळीवर खरेदी करता येईल. या ट्रेडमध्ये 114 वर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारत डायनामिक्स लिमिटेड (Bharat Dynamics Ltd)

  • सीएमपी (CMP) - 931.95 रुपये

  • टारगेट (TARGET) - 1400 रुपये

  • बाय एरियe - (BUY AREA) - (910-870)-837-(804-785) रुपये

  • स्टॉप लॉस - (STOP LOSS) - 730 रुपये

भारत डायनामिक्स लिमिटेडचा (Bharat Dynamics Ltd) स्टॉक डिसेंबर 2021 मध्ये 370 रुपयांवरून एप्रिल 2022 मध्ये 905 रुपयांपर्यंत वाढला. यानंतर शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग दिसली, पण शेअरने 609 आणि 649 वर हायर बॉटम बनवला. त्याच वेळी स्टॉकने 905 चा सर्वकालीन उच्चांक (All time high) ओलांडण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही.

डिमांड इंडेक्स, अरून अप आणि डाउन आणि William % R इंडिकेटर्सने स्टॉकमध्ये खरेदीचे संकेत दित आहेत. अलीकडेच स्टॉकने पॉझिटिव्ह वीकली ब्रेकआउट कँडल बनवली, ज्यामध्ये 976 चा नवीन उच्चांक बनवला गेला. स्टॉकचे टारगेट 1400 आहे. स्टॉकमध्ये सुधारणा असल्यास (910-870)-837-(804-785) रुपयांवर खरेदी करता येईल. 730 रुपयांच्या स्टॉप लॉससह ट्रे़ड करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()