UPI Refund : अय्यो, UPI वरुन दुसऱ्याच नंबरला गेले पैसे?काळजी करू नका, असे मिळवा परत!

असे तुमच्यासोबतही घडले असेल, तर पैसे परत मिळवा
UPI Refund
UPI Refund esakal
Updated on

UPI Refund : UPI वरून पैसे पाठवण्यापूर्वी लोक दुसऱ्याचा नंबर घेतात. त्याला हाय पाठवतात आणि आधी एक रुपया पाठवून मगच त्याला पुर्ण पैसै पाठवले जातात. मोठी रक्कम पाठवायची असल्यास काळजी घेतली जाते. पण, इतकी काळजी घेऊनही कधीतरी तुमच्याकडून नंबर चुकतो आणि चुकीच्या नंबंरला पैसै पाठवले जातात.

UPI मध्ये एवढी काळजी आणि सेफ्टी फीचर्स करूनही चुका होतात. वापरकर्ते चुकीच्या फोन नंबरवर किंवा QR कोडवर पैसे पाठवतात. अशा परिस्थितीत पैसा ज्याच्याकडे जायला हवा त्याच्यापर्यंत तो पोहोचत नाही. चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केलेल्या पैशांचा परतावा कसा मिळवायचा हे अनेकांना माहीत नसते.

UPI Refund
UPI Payment : आता UPI पेमेंटवर येणार मर्यादा? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणी सुरु

बरं पैसै गेलेल्या व्यक्तीला फोन केला तरी तो आपल्याला सहकार्य करेलच असे नाही. त्यामुळे ही शुल्लक गोष्ट डोकेदुखी होऊन बसते. अशा प्रसंगात आपल्या मदतीला UPI रिफंड येते. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याचा आपल्याला कसा फायदा होतो जाणून घेऊयात.

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्ही सर्वात आधी अशा ज्या व्यक्तीला पैसे गेले आहेत त्याला त्याची माहिती द्यावी लागेल. GPay, PhonePe, Paytm किंवा UPI अॅपच्या Costmer Care ला कळवा. ग्राहकांना सेवा देण्यासाठीच या केअरचा उपयोग होतो. तिथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि Refund मागू शकता.

UPI Refund
Modi Cabinet : BHIM UPI च्या ट्रांजॅक्शनवर मिळणार इन्सेटिव्ह; वाचा महत्त्वाचे निर्णय

ग्राहकांकडून चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले गेले, तर bankingombudsman.rbi.org.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवता येते. पैसे परत मिळवण्यासाठी बँकेत अर्ज करावा लागतो. त्यात तुमच्या बँक खात्याची व चुकून पैसे पाठवलेल्या खात्याचीही माहिती द्यावी लागते.

तुमच्याकडून चुकून कोणाला पैसे पाठवले गेले हे माहीत असेल व ती व्यक्ती तुम्हाला पैसे परत करत नसेल, तर त्या व्यक्तीविरोधात NPCI च्या वेबसाईटवर तक्रार दाखल करता येते.

UPI Refund
Smartphone Theft : मोबाईल चोरी झाल्यास असं थांबवा UPI पेमेंट, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

NPCIवर तक्रार कशी करावी?

  • एनपीसीआयच्या (NPCI) वेबसाईटवर तक्रार दाखल करण्यासाठी Dispute Redressal Mechanism इथे जाऊन स्क्रोल करावं.

  • त्यात ट्रॅन्जॅक्शन असं बटण असेल ते क्लिक करावं.

  • तिथे ट्रान्जॅक्शन नेचर, इश्यू, ट्रान्जॅक्शन आयडी, बँक, व्यवहार झाल्याची तारीख, पैसे, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अशी महिती भरावी

  • अशा पद्धतीनं पेमेंट रिफंडसाठी अर्ज करता येऊ शकतो.

UPI Refund
UPI-PayNow : भारत-सिंगापूर क्रॉस बॉर्डर कनेक्टिव्हिटीचा नेमका फायदा कोणाला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()