Commercial Paper Ban RBI Guidelines : भारतात कागदाचा वापर कमी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेतला जात आहे. भारतीय रेल्वे असो की विद्युत विभाग या सर्व ठिकाणी कमीत कमी कागदाचा वापर केला जात असून, भारतीय विमान सेवा क्षेत्रातही कमीत कमी कागदाचा वापर करण्याकडे लक्ष दिले जात आहे. अनेक शहरांमध्ये वीज विभागाने वीज बिल पेपरलेस केले आहे. त्याचवेळी, रेल्वेही आपली कामे मोठ्या प्रमाणावर पेपरलेस करण्याकडे इच्छूक आहे. या सर्वामध्ये रिझर्व बँकेकडून याबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत.
बँकांमधून पेपर गायब होणार
वरील सर्व क्षेत्राची वाटचाल बऱ्यापैकी पेपरलेस होत असताना आता भारतातील बँकिंग क्षेत्रदेखील पेपरलेस करण्याचा विचार सुरू असून, असे झाल्यास बँकेत कागद वापरता येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. तसेच बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी त्यांच्या शाखांमधील कागदाचा वापर बंद करावा, असे आरबीआयने म्हटले असून, आरबीआयने बँकिंग नियामकाला सहमती दिल्यास बँकेच्या शाखांमध्ये कागदाचा वापर पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक होईल.
एटीएममधून मिळणार ई-पावती
कागदाचा वापर पूर्णपणे बंद केल्यास एटीएममधून पैसे काढल्यानंतर मिळणारी पावती ई-पावती स्वरुपात देण्याचा विचार केला जाऊ शकतो. तसेच बँकेच्या शाखांमध्ये सर्व प्रकारचे कागद वापरावर निर्बंध आल्यास ग्राहकांना त्यांचे बँकेशी संबंधित सर्व कामं बँकेच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने करावे लागू शकतील.
आरबीआयने मागवल्या सूचना
रिझव्र्ह बँकेने 'क्लायमेट रिस्क अँड सस्टेनेबल फायनान्स' या विषयावरील चर्चापत्रात म्हटले आहे की, हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींवर आधारित धोरण तयार करायचे आहे. केंद्रीय बँक जागतिक संस्था आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांच्या अनुभवाचा फायदा घेत असून, रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक नियंत्रित संस्थांसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे. हवामान बदलाचे धोके प्रभावीपणे हाताळण्यासाठी धोरण तयार केले जाणार आहे. यासाठी आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत चर्चा पत्रावर टिप्पण्या मागवल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.