शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी एका स्टॉकची खरेदी करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.
शेअर बाजार अशी जागा आहे, जिथे तुमची कमाई कधी दुप्पट होईल किंवा शुन्य होईल सांगता येत नाही. म्हणूनच आपले नुकसान होणे टाळण्यासाठी परफेक्ट शेअर्स निवडणे गरजेचे आहे आणि अशावेळी शेअर बाजार तज्ज्ञ कामाला येतात. शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी एका स्टॉकची खरेदी करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. अगदी कमी काळात हा स्टॉक तुम्हाला भरपूर नफा मिळवून देईल असा विश्वास जैन यांना वाटत आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञ संदीप जैन यांनी कॅश मार्केटमधील आरपीजी लाईफमध्ये (RPG Life) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. एखाद्या चांगल्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या शेअर्सचा विचार नक्की करु शकता.
आरपीजी लाइफचे (RPG Life) शेअर्स का घ्यावे ?
आरपीजी लाइफ ही हर्ष गोएंका यांची ग्रुप कंपनी आहे. संदीप जैन यांनी तिसऱ्यांदा हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या शेअर्सचे व्हॅल्युएशन फार स्वस्त आहे. सोबतच कंपनीने गेल्या 3-4 वर्षांत चांगली कामगिरी केली आहे.
आरपीजी लाइफ (RPG Life)
- सीएमपी (CMP) - 636.95 रुपये
- टारगेट (Target) - 750 रुपये
कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत ?
आरपीजी लाईफ 20 च्या PE मल्टिपलवर काम करते. कंपनीचा इक्विटीचा परतावा 20 टक्के आहे. याशिवाय, डिव्हिडेंड यिल्ड सुमारे 1.15 टक्के आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आरपीजी लाईफवर कोणतेही कर्ज नाही.
कंपनीचे तिमाही निकाल
कंपनीचे तिमाही निकाल उत्कृष्ट होते. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 11 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर यावर्षी कंपनीला 16 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. याशिवाय कंपनीचे मार्केट कॅप 1000 कोटी आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.