मुदतठेव अर्थात ‘एफडी’पेक्षा जास्त परतावा यात मिळतो असे शब्द कानावर पडले, तरी अनेकांचे कुतूहल चाळवले जाते.
- विक्रम अवसरीकर
मुदतठेव अर्थात ‘एफडी’पेक्षा जास्त परतावा यात मिळतो असे शब्द कानावर पडले, तरी अनेकांचे कुतूहल चाळवले जाते. सर्वसामान्य माणूस ज्याला फार खोलात शिरायचे नसते, तो सरळ बँकेत जाऊन मुदतठेव करून मोकळा होतो.
हा साधा सोपा गुंतवणुकीचा लाभदायी मार्ग अशी धारणा बहुसंख्यांची असते. आजच्या काळात मुदतठेवीपेक्षा अधिक परतावा देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जोखीम कमी असलेले आणि परतावा जास्त देणारे, तुलनेत कमी परतावा, मात्र करबचतीच्यादृष्टीने उपयुक्त अशा स्वरूपाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. थोडी शोधाशोध केली, तर असे अनेक चांगले पर्याय मिळू शकतात.
करबचतीच्यादृष्टीने उपयुक्त पर्याय
लिक्विड फंड ः शॉर्ट ड्युरेशन फंड
ज्या लोकांना एक वर्षापेक्षा कमी काळासाठी पैसे ठेवायचे आहेत. त्यांच्यासाठी हा एक उत्तम आहे. परतावा आणि जोखीमही जास्त असणारा पर्याय :
म्युच्युअल फंड
अ) इक्विटी सेव्हिंग फंड : ज्यामध्ये ‘डेट’चा भाग मोठ्या प्रमाणावर असतो. त्याचप्रकारे हे फंड इक्विटीमध्येही गुंतवणूक करतात. त्यामुळे मार्केट वरती जात असेल, तर परतावा वाढतो आणि मार्केट खाली जात असेल, तर त्यात असलेल्या ‘डेट’मुळे फार खाली जात नाहीत.
ब) क्रेडिट रिस्क फंड ः जास्त जोखीम असलेल्या कंपन्यांच्या रोख्यांमध्ये हे फंड गुंतवणूक करतात. जेव्हा व्याजाचे दर वर जात असतात, त्यावेळेस अधिक परतावा मिळतो. जोखीम तेवढीच जास्त असते. ज्यांना जोखीम घेऊन परतावा मिळवायचा आहे. त्यांनी याचा जरूर विचार करावा.
क) टार्गेट मॅच्युरिटी फंड बाँड इंडेक्स ः पॅसिव्हली म्हणजे निष्क्रियपणे गुंतवणूक करणारे हे फंड असतात. या प्रकारच्या फंडांवरील परतावा हा सर्वसाधारणपणे ज्ञात असतो. ज्यावेळेस व्याजदर जास्त असतात.
त्यावेळी या प्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक लाभाची ठरू शकते. जे लोक या फंडांचा कालावधी संपेपर्यंत गुंतवणूक काढत नाहीत, त्यांना फायदा होतो. कोणत्या प्रकारच्या ‘बाँड इंडेक्स’मध्ये गुंतवणूक केली जाते, त्यावर परतावा अवलंबून असतो.
ड) रोखे गुंतवणूक व कंपनी डिपॉझिट ः आरबीआय रीटेल डायरेक्टवर लोक जाऊन स्वतः सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवू शकतात. मात्र इथे गुंतवणूक करण्यासाठी स्वतःला माहिती असणे किंवा एखादा माहितगार सल्लागार असणे गरजेचे आहे.
परताव्याची पूर्वकल्पना देणारा पर्याय म्हणजे कंपनी डिपॉझिट. ‘एएए’ मानांकनप्राप्त कंपन्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात आणि त्यातून कर्ज पुरवठा किंवा आपल्या धंद्याच्या वाढीसाठी वापरतात. मुदतठेवीपेक्षा निदान एक ते १.५ टक्के परतावा जास्त मिळतो.
सरकारी योजना
कमी जोखीम आणि मुदतठेवीपेक्षा जास्त परतावा देणारे पर्याय म्हणजे जणू काही आखूड शिंगी बहुदुधी गायच. मात्र या गाईजवळ ज्येष्ठ नागरिकच जाऊ शकतात. सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम आणि पंतप्रधान वय वंदना या त्या योजना आहेत.
केंद्र सरकारच्या या योजनांमध्ये जोखीम काहीच नाही. परतावा मात्र मुदतठेवीपेक्षा जास्त; पण पैसे तीन वर्षे अडकतात. ज्या लोकांना रोखतेची गरज नाही व खूप काळ थांबू शकतात त्यांनी यात पैसे गुंतवले पाहिजेत.
प्रकार नाव गुंतवणूक परतावा
मुदतठेवीपेक्षा कमी परतावा; - अॅक्सिस लिक्विड फंड - १ वर्षे / ३ वर्षे
करबचतीसाठी उपयुक्त - एचडीएफसी शॉर्ट टर्म डेट - ५% / ४.२२
रिकरिंग डिपॉझिटपेक्षा - मिराई अॅसेट इक्विटी सेव्हिंग - ३.७६/११.८२
जास्त परतावा; जास्त जोखी - आदित्य बिर्ला क्रेडिट रिस्क - ६.२०/८.४७
आरबीआय रिटेल डायरेक्ट - टी बिल्स - कालावधीनुसार वेगवेगळा परतावा.
कंपनी डिपॉझिट - बजाज फायनान्स - ७.९५ (४४ महिने)
- एचडीएफसी लिमिटेड - ७.९० (४५ महिने) ज्येष्ठ नागरिक
प्रधान मंत्री वय वंदना योजना - ७.४% (१० वर्षे)
सिनियर सिटीझन्स सेव्हिंग्ज स्किम - ८% (५ वर्षे)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.