Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

स्टॉक स्प्लिटमध्ये नेमकं काय असतं?
Stock Split
Stock Splitसकाळ
Updated on

शेअर बाजार हे एक खुप मोठं व्यावसायिक जाळ असून येथे अनेक प्रकारचे शब्द वापरले जातात. हे शब्द गुंतवणूकदारांच्या नेहमी मुखावर असतात. डिविडेंड, शेयर बायबैक, स्टॉक स्प्लिट सारखे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. पण स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? स्टॉक स्प्लिटमध्ये नेमकं काय असतं? गुंतवणूकदार का आणि कशासाठी या शब्दाचा वापर करतात? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Stock Split
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टीची घसरण, तर टाटा स्टीलला सर्वाधिक लाभ

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय?

स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअर स्प्लिट. सोप्या भाषेत सांगायचे तर, कोणताही एक पार्ट तोडून त्या पार्टचे दोन किंवा अधिक पार्ट करणे. स्टॉक स्प्लिटद्वारे, कंपन्या त्यांचे शेअर्स एकापेक्षा जास्त शेअर्समध्ये विभाजित करू शकतात.

Stock Split
Stocks to Buy: तगडा रिटर्न देतील 'हे' शेअर्स, तज्ज्ञांना विश्वास

स्टॉक स्प्लिट करण्याची का आवश्यकता असते?

शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर खूप महाग असतो तेव्हा छोटे गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करण्यास टाळतात. अशावेळी या छोट्या गुंतवणूकदारांसाठी कंपनी स्टॉक स्प्लिट करते. सोबतच शेअर मार्केटमधील मागणी वाढवण्यासाठीही कंपन्या अनेकदा स्टॉक स्प्लिट करतात.

Stock Split
Multibagger Stock | 2022 मध्ये 'हे' 3 स्टॉक्स ठरु शकतात मल्टीबॅगर

शेअरहोल्डर काय फायदा होतो?

जर एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत जास्त असेल तर शेअरचे दोन भाग केले जातात. एखाद्या कंपनीने स्टॉक स्प्लिट केल्यास, शेअरहोल्डर यांना तिच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरसाठी एक अतिरिक्त शेअर दिला जातो. यामुळे शेअरहोल्डर यांच्या जवळ शेअर्सची संख्या दुप्पट होते.

उदाहरण, एखाद्या शेअरहोल्डरकडे कंपनीचे 400 शेअर्स आहेत आणि कंपनीने स्टॉक स्प्लिट करून 1 शेअर 2 मध्ये विभागले, तर शेअरहोल्डरकडे आता कंपनीचे 800 शेअर्स असतील. मात्र यामुळे त्यांच्या गुंतवणुकीच्या किंमतीवर काहीही परिणाम होणार नाही.कारण स्टॉक स्प्लिट केल्याने प्रत्येक शेअरची किंमत अर्धी होत जाते

Stock Split
Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

स्टॉक स्प्लिटमुळे कंपनीवर काय परिणाम होतो?

स्टॉक स्प्लिट कंपनीच्या शेअर्समध्ये लिक्विडिटी आणते. लहान गुंतवणूकदारांचा कल स्टॉककडे वळतो. किंमत कमी झाल्यामुळे स्टॉकची तेजी वाढण्याची शक्यता वाढते. कमी वेळासाठी कंपनीच्या शेअर्स वर येतात.मात्र याचा कंपनीच्या मार्केट कैपिटलाइजेशनवर काहीही परिणाम होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.