आज कोणते शेअर्स तुम्हाला देतील तगडी कमाई ?

शेअर्स
शेअर्स esakal
Updated on

बुधवारी सेन्सेक्स 90.99 अंकांनी अर्थात 0.16 टक्क्यांनी घसरून 57,806.49 वर बंद झाला, तर निफ्टी 19.65 अंकांनी अर्थात 0.11 टक्क्यांनी घसरून 17,213.60 वर बंद झाला. बुधवारी मेटल, बँकिंग आणि आयटी शेअर्सवर दबाव दिसून आला. फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी झाली. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये काही हालचाल दिसली नाही.

सेन्सेक्सच्या 30 पैकी 18 शेअर्सची विक्री झाली तर निफ्टीचे 50 पैकी 30 शेअर्सची घसरले. दुसरीकडे, निफ्टी बँकेच्या 12 पैकी 8 शेअर्सची विक्री झाली. रुपाया 9 पैशांनी कमजोर होऊन 74.74 वर बंद झाल

शेअर्स
क्रिप्टोकरन्सीचा ग्राहक संरक्षणाला धोका; रिझर्व्ह बँकेचा इशारा

आज बाजाराची वाटचाल कशी राहील ?


बुधवारी निफ्टीमध्ये डेली स्केलवर डोजी कँडल तयार केली. याने दोन ट्रेडमध्ये हायर हाईज आणि हायर लोज केल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअलचे चंदन तापडिया यांनी सांगितले. त्यामुळे निफ्टीला 17300-17350 च्या दिशेने जाण्यासाठी 17200 च्या वर राहावे लागेल. तर खाली आता 17150-17100 वर सपोर्ट आहे असेही ते म्हणाले.
17,250-17,300 ची पातळी निफ्टीसाठी खूप महत्त्वाची असेल असे दीनदयाल इन्व्हेस्टमेंट्सचे मनीष हथिरामानी म्हणाले. निफ्टी 17300 च्या वर बंद झाल्यावरच तेजीच्या टप्प्यात प्रवेश करेल असेही त्यांचे म्हणणे आहे.


ओवरऑल स्ट्रक्चर पॉझिटिव्ह दिसत असल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. जर निफ्टी क्लोजिंग बेसिसवर 17200 वर टिकली तर 17000 सपोर्ट आहे आणि 17400 वर रझिस्टेंस असेल. दुसरीकडे, बँक निफ्टीसाठी, 34,500 वर सपोर्ट आहे आणि 35,500 वर रझिस्टेंस आहे असे ते म्हणाले.

शेअर्स
२०२१ मधील टॉप युनिकॉर्न गुंतवणूकदार कोण?

आज कोणते शेअर्स तुम्हाला देतील तगडी कमाई ?


आशयर मोटर्स (EICHERMOT)बजाज ऑटो (BAJAJAUTO)सनफार्मा (SUNPHARMA)डिविस लॅबोरेटरी (DIVISLAB)इंडसइंड बँक (INDUSIND)आयडिया (IDEA)टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)ए यू बँक (AUBANK)ॲस्ट्रल (ASTRAL)यूनायटेड फॉस्फरस लिमिटेड (UBL)


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.