२०२१ मधील टॉप युनिकॉर्न गुंतवणूकदार कोण?

२०२१ मधील टॉप युनिकॉर्न गुंतवणूकदार कोण?
Updated on
Summary

Hurun ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2021 नुसार, Sequoia सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात यशस्वी युनिकॉर्न गुंतवणूकदार म्हणून नावारुपाला आली.

वाढते डिजिटायझेशन आणि इंटरनेटची गती या सगळ्यामुळे आर्थिक वर्ष 2021 मध्ये टेक युनिकॉर्नचा जन्म झाला. युनिकॉर्नचा अर्थ स्टार्टअप असा आहे. यावर्षी 1,058 युनिकॉर्न (privately owned billion-dollar firms) जोडल्या गेल्या ज्या की गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट असल्याचे हुरून रिसर्चमध्ये आढळून आले आहे. गेल्या वर्षी 586 युनिकॉर्न जोडल्या गेल्या होत्या. यूएस-बेस्ड VC फर्मने प्रत्येक 5 पैकी एका युनिकॉर्नला निधी दिला, यावर्षी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 97 अब्ज-डॉलर कंपन्या जोडल्या गेल्या. (Who are the top unicorn investors of 2021)

२०२१ मधील टॉप युनिकॉर्न गुंतवणूकदार कोण?
'हे' पाच व्यवहार रोखीने केल्यास घरपोच येईल टॅक्‍स नोटीस!

Sequoia मध्ये Sequoia Capital, Sequoia Capital China, Sequoia Capital India, Sequoia Capital Global Equities, Sequoia Heritage, Sequoia Capital Israel, and Sequoia Scout यांचा समावेश आहे, वर्षभरात 97 नवीन युनिकॉर्नची भर पडली, आणि 2021 च्या अखेरीस हा आकडा 206 पर्यंत पोहोचला.

दुसरीकडे टायगर ग्लोबल जगातला दुसरा सर्वात मोठा युनिकॉर्न गुंतवणूकदार म्हणून समोर आला आहे. टायगर फंडने 112 युनिकॉर्न जोडले, त्याची टॅली आता 147 वर आहे. तर SoftBank ने या वर्षी आपला जागतिक युनिकॉर्न बेस 95 ते 146 पर्यंत वाढवला.

२०२१ मधील टॉप युनिकॉर्न गुंतवणूकदार कोण?
नवीन वर्षात बदलताहेत 'हे' तीन नियम! दुर्लक्ष कराल तर पडेल महागात

'बिग थ्री' म्हणून ओळखल्या जाणार्‍या सेक्वॉइया (Sequoia), टायगर आणि सॉफ्टबँकने जगातील 50% युनिकॉर्नमध्ये गुंतवणूक केल्याचे हुरुन संशोधन संस्थेने (Hurun Research Institute) म्हटले आहे. "युनिकॉर्न शोधणे कठीण आहे, पण Sequoia, Tiger Fund आणि Softbank सारख्या फर्मने हे सोपे केल्याचंही त्यात म्हटले आहे.

2021 वर्षातील इतर टॉप युनिकॉर्न गुंतवणूकदारांमध्ये US-based Accel, Goldman Sachs आणि Andreessen Horowitz (a16z) यांचा समावेश आहे तर चीनच्या Tencent आणि Hillhouse Capital Group सुद्धा या लिस्टमध्ये राहिले.

२०२१ मधील टॉप युनिकॉर्न गुंतवणूकदार कोण?
आयकर विभागाने वाढवली ITR पडताळणीसाठी फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत

बऱ्याच व्हिसीची मुख्यालये यूएसमध्ये आहेत, युएसमध्ये एकुण 79 मुख्यालये आहेत, त्यानंतर नंबर लागतो चीनचा (11) तर हुरुनच्या लिस्टनुसार सिंगापूर आणि यूकेमध्ये प्रत्येकी 2, तर फ्रान्स, जर्मनी, भारत, इस्रायल, जपान आणि रशियामध्ये प्रत्येकी एक आहे.

“गुंतवणूकदारांची भूमिका फक्त आर्थिक मदत करण्यापुरती मर्यादित राहिली नाही आहे, आता ही भुमिका योग्य मार्गदर्शन आणि वाढीच्या संधींची माहिती पोहोचवण्यापर्यंत बदलल्याचे हुरुनचे अध्यक्ष आणि मुख्य संशोधक रुपर्ट हूगेवेर्फ (Rupert Hoogewerf) यांनी म्हटले. जगातील आघाडीचे युनिकॉर्न गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओसह इकोसिस्टम तयार करत आहेत, जे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप्ससाठी खुप पोषक आहे असेही ते म्हणाले. एक गुंतवणूकदार म्हणून तुमच्याकडे टॉप युनिकॉर्न ब्रँड अहे हीच तुमच्या स्टार्टअपची एक मोठी ताकद असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

संस्थापक (Founder teams) आणि गुंतवणूकदार (investors) विक्रीपेक्षा व्हॅल्यू क्रिएशनवर लक्ष केंद्रित करून अब्ज डॉलर्सचा व्यवसाय कसा उभारायचा याचा अनुभव घेत असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.