Modi Vs Singh : अर्थव्यवस्था हाताळण्यात मोदी सरस की मनमोहन सिंग? सर्वेक्षणात लोक म्हणतात, मोदी...

या सर्वेक्षणात एनडीए सरकारच्या कामाबाबत देशातील जनतेचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Narendra Modi Vs Manmohan Singh
Narendra Modi Vs Manmohan SinghSakal
Updated on

Narendra Modi Vs Manmohan Singh : 1 फेब्रुवारी 2023 ला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पुढील वर्षी होणा-या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी विद्यमान मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल.

जेव्हा आपण मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा करतो तेव्हा 2020, 2021 आणि 2022 ही वर्ष खूप कठीण होती. या काळात जग कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धासारख्या भू-राजकीय तणावाने ग्रासले.

कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आणि त्यामुळे व्यवसायांचे मोठे नुकसान झाले. लाखो लोकांच्या नोकऱ्याही गेल्या. जेव्हा महामारी कमी झाली तेव्हा फेब्रुवारी-2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध झाले, त्यामुळे पुरवठा साखळीचे बरेच नुकसान झाले.

कोरोना आणि युद्धामुळे महागाई :

कोविड आणि त्यानंतरच्या रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाई लक्षणीय वाढली. यासोबतच जगातील अनेक भागात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती.

इंधन आणि वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या. विशेषतः युद्धाच्या सुरुवातीच्या महिन्यांत किंमती खूप जास्त होत्या. अमेरिका आणि युरोपातील काही भागांमध्ये मंदीच्या भीतीने इंधनाचे दर खाली आले.

देशाची वित्तीय तूट वाढली :

भारताची वित्तीय तूट किंवा देशाचे उत्पन्न आणि खर्च यांच्यातील तफावत वाढली आहे. डिसेंबरमध्ये व्यापार तूट 23.89 अब्ज डॉलर (रु. 1.94 लाख कोटी) झाली. व्यापारी तूट म्हणजे आयात आणि निर्यात केलेल्या वस्तूंच्या किमतीतील फरक.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

रुपयाची घसरण आणि निर्यातीतील घट यामुळे व्यापार तूट वाढली. जुलैमध्ये पहिल्यांदाच रुपयाने डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

सर्वेक्षण कोणाच्या बाजूने :

इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने मूड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात एनडीए सरकारच्या कामाबाबत देशातील जनतेचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या सर्वेक्षणात नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग सरकारच्या तुलनेशी संबंधित प्रश्न लोकांना विचारण्यात आले. या सर्वेक्षणात 'तुमच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेचे अधिक योग्य व्यवस्थापन कोणी केले?', असा प्रश्न विचारण्यात आला होता.

Narendra Modi Vs Manmohan Singh
Adani Group : बँकांचे 80,000 कोटी रुपये बुडणार? अदानी ग्रुपला सर्वात जास्त कर्ज देणाऱ्या SBI चे मोठे वक्तव्य

या प्रश्नाच्या उत्तरात 51 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींचे नाव घेतले आहे. 51टक्के लोकांच्या मते मोदी सरकार अर्थव्यवस्था हाताळण्यात अधिक सक्षम होते. तर 36 टक्के लोकांनी मनमोहन सिंग यांचे नाव घेतले. याशिवाय 13 टक्के लोकांनी याबाबत स्पष्टपणे काहीही सांगू शकत नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.