Loan Defaulter कोण असतो? EMI भरू न शकल्यास काय करावे?

जर तुम्ही एक किंवा दोन वेळा कर्जाचे हफ्ते भरू शकला नाही तर काय होऊ शकते? हे माहित असणे गरजचे आहे.
loan
loan
Updated on

जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेता तेव्हा आपल्या सहमतीने कर्ज परतफेड करण्यासाठी कायेदशीर रित्या बांधिल होता. तुम्हाला कर्ज परत फेड करण्याचा हेतू असला तरी तुम्ही वेळेत कर्ज फेड करू शकणार नाही असेही होऊ शकते. तुम्ही रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये कर्ज परतफेड करण्यास विसरू शकता. काही कारणास्तव एकानंतर एक तुम्ही हफ्ते थकले जाऊ शकतात. हे सर्व तुमच्या लक्षात येईपर्यंत तुमच्यावर पर्सनल लोन डिफॉल्टरचा टॅग लागला जाऊ शकतो. जर तुम्ही एक किंवा दोन वेळा कर्जाचे हफ्ते भरू शकला नाही तर काय होऊ शकते? हे माहित असणे गरजचे आहे. तसेच पर्सनल लोड डिफॉल्टमुळे तुम्हाला तुमच्या क्रेडीट हिस्ट्रीवर कसा परिणाम करू शकते जाणून घ्या.

loan
सोने खरेदीची हीच योग्य वेळ; दसऱ्याला सुवर्ण संधी

Loan Defaulter कोण असतो?

तुम्ही जर एखाद्या तारखेला EMI करु शकला नाही तर तुम्ही डिफॉल्टर बनत नाही त्यामुळे एका नंतर एक तुम्ही कित्येक EMI थकवले तर तुम्हाला कर्ज देणारे तुम्हाला डिफॉल्टर म्हणून रिपोर्ट करू शकतात. त्यापैकी काही तुम्हाला कर्ज परतफेड करण्यासाठी काही वेळ देऊ शकतात पण तुमच्याकडे EMI भरण्यास उशीर केल्याबद्दल ठराविक रक्कम दंड म्हणून आकारु शकतात. त्यामुळे क्रेडिट स्टेटस सुधारण्याची संधी मिळते.

तज्ज्ञाच्या माहितीनुसार, जर तुम्ही EMI भरु शकला नाही तर काय होईल?हे जाणून घेऊ या...

तुमचा क्रेडिट स्कोर प्रभावित होईल

सर्व बँका आणि एनबीएफला EMI न भरू शकल्यास त्याच अहवाल सिबिल (CIBIL)क्विफैक्स सारख्या क्रेडिट ब्यूरो द्यावा लागतो. रिपोर्ट केल्यानंतर ते तुमचा सिबिल स्कोर कमी होतो आणि त्यामुळे भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्रेडीट/ कर्ज मिळणे अवघड होईल.

loan
TATA मोटर्सच्या शेअर्सची कोटीच्या कोटी उड्डाणे

तुमच्यासोबत साक्षीदारावरही होतो परिणाम

जर तुम्ही पर्सनल लोनसाठी साक्षीदार किंवा गॅरटर असाल तर, वेळीच परतफेड न झाल्यास तुमचा क्रेडिट स्कोरवर देखील परिणाम होऊ शकतो. त्या शिवाय कर्जाची रक्कम वसूलीसाठी प्रयत्न करताना लोन देणारे आणि रिकव्हरी एजेंट्सचे सतत कॉल येत राहतील.

तुमच्या आर्थिक समस्या वाढतील

लेट फी, पेनल्टी, कायदेशीर खर्च अशा खर्च शिल्लक कर्जाच्या रक्कमेत जोडले जाते. त्यामुळे जे कर्ज घेतले नाही त्यामुळे परतफेड करण्याची कर्ज रक्कम वाढत जाते.

loan
निफ्टी 18,100 पार, गुंतवणूकदारांची संपत्ती 5 दिवसात 6 लाख कोटींवर

बँक आणि एनबीएफसी कायदेशीर कारवाई करू शकते

जर तुम्हाला दिलेले कर्ज परतफेड करू शकला नाही तर कर्ज देणारी संस्था कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकते.

तुम्ही जर वेळेत परतफेड करू शकत नसाल तर अशा वेळी काय कराल?

कर्ज देणाऱ्यांसोबत बोला : अशी कोणतीच गोष्ट नाही जी बोलून सोडविता येत नाही. जर लोन देणारी संस्थेसोबत तुम्ही संपर्क करा आणि डिफॉल्ट होण्याचे कारणा सांगा. कदाचित ते तुम्हाला असा काहीतरी उपाय सुचवतील ज्यामुळे दोघांची समस्या सुटेल. तुम्ही रिपेमेंट करण्यासाठी कर्ज देणाऱ्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास तुम्ही आणखी वेळ मागून घेऊ शकता. जर काहीच पर्याय नसेल तर तुम्ही बँकेसोबत सेटलमेंट करण्याची विनंती करू शकता.

loan
खूशखबर! 'या' दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये येणार

स्वत:चा उत्पन्न वाढविण्यासाठी खर्च कमी करा

जास्त पैस कमविण्यासाठी काही शॉर्ट टर्म जॉब्स फ्रिलॅन्स प्रॉजेक्ट एक्सप्लोर करु शकता. जर पर्याय नसले तर बचत वाढिवण्यासाठी महिन्याचे खर्च कमी करा.

डिफॉल्टर म्हणून स्वत:चे अधिकार जाणून घ्या

RBIद्वारा बँक आणि अन्य वित्तीय संस्था निंयत्रित केल्या जातात. आपल्या ग्राहकांसाठी प्रतिबद्धता कोडसाठी बांधिल असतात. त्यामुळे कायद्यानुसार बँक किंवा बँकेद्वारे निवडल्या जाणाऱ्या रिकव्हरी एजंट तुम्हाला धमकावू शकत नाही किंवा तुम्हाला त्रास देऊ शकत नाही.

पर्सनल लोन एक असुरक्षित असते आणि ते तुम्हाला ते परतफेड करण्याच्या क्षमतेवर आधारित असते. त्यामुळे सहमती दिल्यामुळे कर्ज परत करणे तुमचे कर्तव्य आहे. असे न केल्यास तुम्ही क्रेडीट हेल्थ आणि फायनाईशिअल परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.