झोमॅटोनंतर आता 'स्वीगी'चाही IPO येणार ?

झोमॅटोनंतर आता 'स्वीगी'चाही IPO येणार ?
Updated on
Summary

स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोचा नुकताच पब्लिक ऑफर (IPO)आला होता, ज्याला गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.

पुणे: स्विगीचा IPO आल्यास चांगल्या परताव्याची आशा आहे. सॉफ्टबँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मसायोशी सन (Masayoshi Son) यांना विश्वास आहे. स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोचा नुकताच पब्लिक ऑफर (IPO)आला होता, ज्याला गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.

फूड डिलिव्हरी फर्म स्विगीने पब्लिक ऑफर (IPO)आणायचे ठरवले तर त्यांना चांगली लिस्टिंग मिळू शकते, असा विश्वास जगातील अनेक देशांमध्ये गुंतवणूक असलेल्या जपानस्थित सॉफ्टबँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मसायोशी सन (Masayoshi Son)यांना वाटतोय.

झोमॅटोनंतर आता 'स्वीगी'चाही IPO येणार ?
स्टरलाइट पॉवर ट्रान्ससमिशनने IPOसाठी SEBI मध्ये जमा केली कागदपत्रे

सॉफ्टबँक्सने अलीकडेच स्विगीसाठी 1.25 अब्ज डॉलर्सचा निधी उभारला. निधी उभारणीसाठी स्विगीचे मूल्य सुमारे ५ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त लावण्यात आले होते. जर स्विगीचा IPO येतो तर आपल्याला चांगल्या परताव्याची आशा असल्याचे सॉफ्टबँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मसायोशी सन (Masayoshi Son) यांनी मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात म्हटले.

फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये स्विगीला टक्कर देणाऱ्या झोमॅटोचा नुकताच IPO आला होता, ज्याला गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. कंपनीचे स्टॉक्सही IPO च्या किंमतीपेक्षा जवळपास दुपटीवर व्यवसाय करत आहेत. लिस्टिंगनंतर झोमॅटोचे बाजार भांडवल 13 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे. यावर्षीच्या सुरुवातीला एका खासगी निधीसाठी झोमॅटोचे मूल्य सुमारे पाच अब्ज डॉलर्स होते.

झोमॅटोनंतर आता 'स्वीगी'चाही IPO येणार ?
लिस्टिंगच्या दिवशी कोणत्या IPO ने गुंतवणूकरांचे पैसे केले दुप्पट, जाणून घेऊयात सविस्तर...

स्विगीजवळ दोन कोटीपेक्षा जास्त मंथली यूजर्स असल्याचे सॉफ्टबँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मसायोशी सन (Masayoshi Son)यांनी सांगितले. या जूनमध्ये प्रतिदिवशी जवळपास 15 लाख ऑर्डर मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. मागच्या एका वर्षात ही संख्या जवळपास अडीच पट वाढली आहे, तर महसूल 2.8 पट वाढला असल्याचेही मसायोशी सन म्हणाले.

सॉफ्टबँकने नुकताच 45 अब्ज डॉलरचा वार्षिक नफा घोषित केला. हा जापानच्या कंपन्यांसाठी एक रेकॉर्ड आहे. सॉफ्टबँकला आपल्या पोर्टफोलियोमध्ये समाविष्ट असणाऱ्या कंपन्यांच्या चांगल्या लिस्टिंगचा फायदा मिळाला आहे, यात प्रामुख्याने दक्षिण कोरियाची Coupang चा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.