परवान्याशिवाय चालवूच नका वाहन! तर होईल आयुष्य उद्ध्वस्त

no control of police on vehicle's horns & headlights
no control of police on vehicle's horns & headlights
Updated on
Summary

विनापरवाना वाहन चालविणाऱ्यास नविन मोटार वाहन कायद्यानुसार ५०० रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. हा दंड तब्बल १० पट वाढविण्यात आला आहे. अद्याप महाराष्ट्रात हा कायदा लागू केलेला नाही. त्यामुळे सध्यातरी जुन्याच पद्धतीने दंडाची आकारणी केली जात आहे.

औरंगाबाद : वाहन चालवण्याचा परवाना Driving Licenses ही कायदेशीर बाब आहे. विनापरवाना वाहन चालवले तर दंड होऊ शकतो. मात्र दंडापेक्षाही परवाना नसेल आणि अपघात झाला तर आयुष्य उध्वस्तही होऊ शकते. त्यामुळे विनापरवाना वाहन चालवणे कटाक्षाने टाळलेच पाहिजे. वाहनधारक किंवा वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे व त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे, हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते. वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना (लायसेन्स) अनिवार्य असतो. वाहन परवानामध्ये जवळपास २४ प्रकार आहेत.without license don't drive vehicle, otherwise life ruins marathi news

no control of police on vehicle's horns & headlights
पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकरांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

काय होऊ शकते?

विनापरवाना वाहन चालविणाऱ्यास नविन मोटार वाहन कायद्यानुसार ५०० रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. हा दंड तब्बल १० पट वाढविण्यात आला आहे. अद्याप महाराष्ट्रात हा कायदा लागू केलेला नाही. त्यामुळे सध्यातरी जुन्याच पद्धतीने दंडाची आकारणी केली जात आहे. विनापरवाना वाहन पकडले तर दंड भरुन सुटका होऊ शकते, मात्र वाहन परवाना नसताना तुमच्याकडून अपघात झाला तर मात्र मनस्तापाशिवाय काहीही पर्याय नाही. अपघात किरकोळ असेल तर वाहनाचे नुकसान भरून कदाचित सुटका होऊ शकते मात्र अपघातात कुणाचा मृत्यू झाला तर मात्र वसुलीच्या दाव्याला सामोरे जावे लागते.

विमा कंपनी करते हातवर

वाहन चालकाकडे वैध वाहन परवाना असणे ही विमा मिळवण्यासाठीची प्रमुख अट आहे, अन्यथा विमा कंपनी क्लेम देत नाही. ज्याचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाने नुकसान भरपाईचा दावा टाकला आणि वाहन परवाना नसल्यास तो दावा वाहन चालविणाऱ्याच्या अंगावर पडतो. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय, त्याच्यावर अवलंबून असणारे व्यक्ती आणि त्याची एकूण राहिलेली सेवा किंवा त्याचा व्यवसाय याचा एकत्र हिशेब करुन हा दावा मोटार अपघात न्यायाधिकरणाकडून मंजूर केला जातो. हा दावा हजारापासून ते पन्नास साठ लाख किंवा अधिकही असू शकतो. त्यामुळेच विनालायसन वाहन चालवणे आयुष्य उध्वस्थ करु शकते याची जाणिव ठेवणे आवश्यक आहे.

no control of police on vehicle's horns & headlights
लातुरात एकाच साडीला दोन बहिणींनी गळफास घेऊन केली आत्महत्या

असे आहेत काही प्रकार

- मोटार सायकल ५० सी. सी.

- मोटार सायकल विना गिअर.

- मोटार सायकल गिअर सह.

- लाईट मोटार व्हेईकल नॉट ट्रान्सपोर्ट.

- लाईट मोटार व्हेईकल ट्रान्सपोर्ट.

- हेवी मोटार व्हेईकल

काही महत्वाच्या गोष्टी

• लर्नर्स लायसन्स हे सहा महिन्यांच्या मुदतीसाठी असते.

• कायमस्वरूपी लायसन्स हे दीर्घ मुदतीसाठी असते. मात्र त्यासाठी प्रथम लर्नर्स लायसेन्स आवश्यक.

• ड्राईव्हिंग लायसेन्स प्राप्त करण्यासाठी लर्नर्स लायसेन्स काढणे बंधनकारक आहे.

• वाहन परवाना काढण्यासाठी १८ वर्ष पूर्ण झालेले आवश्यक आहे.

• अवजड वाहनचालक परवान्यासाठी २० वर्ष पूर्ण व वाहन चालविण्याचे नियम व प्रशिक्षण पूर्ण असावे.

no control of police on vehicle's horns & headlights
पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

वाहन परवाना ही कायदेशीर बाब आहे. वाहन परवाना नसेल तर दंड भरुन सुटका होऊ शकते. मात्र अपघात झाल्यानंतर कायद्यातून सुटका होणे अवघड असते. अनेक कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागते. त्यामुळे विनापरवाना वाहन चालवणे टाळलेच पाहिजे.

-सुरेश वानखेडे, सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक

वाहन चालवताना कायद्याने तुमच्याजवळ वैध परवाना आवश्यक आहे. विनापरवाना वाहन चालवणे कायदेशीर गुन्हा ठरतो. दंडात्मक कारवाई होऊ शकते. विम्याचा दावा फेटाळला जाते, त्यामुळे ही रक्कम चालकाला भरावी लागू शकते. त्यामुळे वाहन परवाना काढणे आवश्यक ठरते.

-ॲड. कल्पेश गायकवाड, विधिज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.