Saving Habits : बचतीच्या बाबतीत पुरुषांपेक्षा महिला अधिक हुशार

पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक चांगली बचत करू शकतात. त्या बाबतीत त्या अधिक शिस्तीच्या असतात.
Women Saving Habits
Women Saving Habitsesakal
Updated on

Women Saving Habits : आजची नारी, जगात भारी असं उगाच म्हणत नाहीत. अगदी पुर्वीपासून काटकसर करून थोडे पैसे वाचवून ठेवून संसाराला हातभार लावणाऱ्या अनेक स्त्रियांची उदाहरणं आपल्याला माहित आहेत. हा गुण महिलांमध्ये मुळातच असतो. पण यामागचं नेमकं कारण काय, जाणून घेऊया

Women Saving Habits
Women Saving Habitsesakal

अधिक शिस्तप्रिय

जेव्हा बचतीचा मुद्दा येतो तेव्हा काही सीमा बनवून नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. याबाबतीत महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक शिस्तप्रिय असल्याने त्यांना बचत करणं सहज शक्य होते.

Women Saving Habits
Save Money : छोट्याशा पगारात अशी करा मोठी बचत; कधीच भासणार नाही पैशांची कमतरता

पुरुषांच्या तुलनेत महिला कमी रिस्क घेतात

सामान्यतः पुरुषांच्या तुलनेत महिला कमी रिस्क घेतात. त्या सुरक्षित व्यवहार करण्यावर भर देतात. शिवाय बचतही सुरक्षित ठिकाणी करण्यावर त्यांचा भर असतो. मग कमी रिटर्न्स मिळाले तरी हरकत नाही असा दृष्टीकोन असतो.

Women Saving Habits
Saving Scheme : सरकारकडून सर्वसामान्यांना नववर्षाची भेट!
Women Saving Habits
Women Saving Habitsesakal

पैसे जबाबदारीने खर्च करतात

वस्तू असो वा पैसा ते अधिक जपून आणि जबाबदारीने वापरण्यावर महिलांचा भर असतो. त्यामुळेच त्यांच्यात बचतीची सवय लागते. जेव्हाही बचत आणि गुतवणूकीचा विषय येतो तेव्हा महिला अधिक जबाबदारीने वागतात. त्या अधिक जबाबदारीने सांभाळू शकतात.

दीर्घकालीन वित्तीय योजनांना प्राधान्य

महिला गुंतवणूक करताना दीर्घकालीन योजनांना प्राधान्य देतात. ज्यामुळे बचत करण्याची सवय सुधारत जाते. त्यामुळे फायदा मोठा मिळतो. शिवाय महिला बचतीसाठी इतरांची मदत घ्यायला कमीपणा समजत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()