Bitcoin मुळे अब्जाधीश झालेला म्हणतोय ‘बोरिंग है अमीर बनना’

ब्रिटनमधील एक व्यक्ती बिटकॉइनच्या (Bitcoin) मदतीने अब्जाधीश झाला आहे. मात्र तो त्यावर खूश नाहीयेय.
Bitcoin
BitcoinSakal
Updated on
Summary

ब्रिटनमधील एक व्यक्ती बिटकॉइनच्या (Bitcoin) मदतीने अब्जाधीश झाला आहे. मात्र तो त्यावर खूश नाहीयेय. तो म्हणतो की श्रीमंत होणे कंटाळवाणे वाटते. आयुष्यात काहीतरी उणीव असल्यासारखे वाटतेय. काय आहे हे संपूर्ण प्रकार ते जाणून घेऊया.

प्रत्येक माणसाला जास्तीत जास्त पैसे कमवायचे असतात. करोडपती होण्यासाठी लोक काय करत नाहीत? जर एखाद्याचे स्वप्न सत्यात उतरले तर तो खूप आनंदी होतो, परंतु ब्रिटनमधील (Britain) एक व्यक्ती आहे जो बिटकॉइनमधून (Bitcoin) अब्जाधीश बनला आहे, परंतु या यशाने तो खूश नाहीयेय. तो म्हणतो की श्रीमंत होणे कंटाळवाणे वाटत आहे. आयुष्यात काहीतरी उणीव असल्यासारखे वाटतेय. काय आहे हे संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.

सर्व बचत क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवली गेली

रिपोर्टनुसार, या व्यक्तीने सोशल मीडियावर (Social media)आपली ओळख न सांगता श्रीमंत होण्याचा अनुभव शेअर केला. त्याने सांगितले की 2014 मध्ये त्याला बिटकॉईनबद्दल माहिती मिळाली. यानंतर त्यांनी त्यात पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. दीड वर्षात या व्यक्तीने आपली सर्व बचत बिटकॉइनमध्ये गुंतवली. 2017 मध्ये त्यांनी 20 कोटींचा नफा कमावला. 2019 मध्ये त्यांनी क्रिप्टोकरन्सीमधून (Cryptocurrency) 2 अब्ज 62 कोटी रुपयांहून अधिक कमावले. वयाच्या 35 व्या वर्षी तो अब्जाधीश झाला.

Bitcoin
अब्जाधीश महिला बॉसचा सरप्राईज 'बोनस'

या व्यक्तीचे म्हणणे आहे की, इतके पैसे कमावल्यानंतर मी नोकरी (Job)सोडली आणि फिरायला लागलो, पण माझा जीवनातील उत्साह कमी झाला. पूर्वी काम करून मिळणारा आनंद आता मिळत नाही. आता आयुष्य कंटाळवाणे वाटत आहे, आज या पैशाने तो अनेक वस्तू विकत घेऊ शकतो, पण त्याचे जुने दिवस त्याला हवे असले तरी विकत घेता येत नाहीत. फसवणूक करून एवढा पैसा मिळवला असे त्याला वाटते. हा पैसा त्याच्या मेहनतीचा नाही.

रिपोर्टनुसार, ही व्यक्ती पूर्वी कंटेंट क्रिएटर (Content Creator) म्हणून काम करत होती. तेथे त्यांना दरमहा २५ लाख रुपये पगार मिळायचा. पगाराचा बराचसा भाग तो बचतीत खर्च करत असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.