औरंगाबाद : नोकरी की व्यवसाय, असे दोन पर्याय समोर असताना सेलमोह (ता.गंगाखेड, जि. परभणी) येथील बालाजी मुंडे यांनी व्यवसायाचा पर्याय निवडला. मार्केट, ग्राहकांच्या गरजांच्या अभ्यास करुन अल्पावधीत स्वतःच्या ‘शिवम फूड्स ॲण्ड स्पायसेस’ (Shivam Foods And Spices) या कंपनीच्या माध्यमातून मसाल्याचे दोन ब्रॅण्ड विकसित केले. त्यांनी तयार केलेल्या मसाल्यांना आज राज्यातील १४ जिल्ह्यांतून मागणी आहे.
शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचा विचार सोडला
बालाजी मुंडे (Balaji Munde) हे मूळचे सेलमोह येथील. परभणीच्या (Parbhani) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात (Vasantrao Naik Marathwada Agriculture University) त्यांनी एमएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेतले. एमएस्सी ॲग्रीच्या शेवटच्या वर्षात असताना लहान भावासाठी व्यवसाय सुरु करण्याचा कुटुंबाने विचार केला होता. २००१ मध्ये त्यांनी भावासाठी छोटेखानी व्यवसाय सुरु करुन दिला. मात्र, ऑगस्ट २००१ मध्ये लहान भावाचे अपघाती निधन झाले. त्यावेळी बालाजी मुंडे हे एमपीएससीची (MPSC) पण तयारी करत होते. मात्र भावाचे निधन झाल्यानंतर त्यांच्यासमोर नोकरी की व्यवसाय असे दोन प्रश्न होते. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नोकरी करण्याचा विचार सोडून देऊन व्यवसाय करण्याचा निर्धार केला. २००२ मध्ये त्यांनी १६ लाखांचे कर्ज घेतले. परभणी एमआयडीसीमध्ये छोटासा गाळा घेऊन ५ जानेवारी २००३ रोजी ‘शिवम फुड्स ॲण्ड स्पायसेस’ या कंपनीच्या माध्यमातून मसाले तयार करण्याच्या व्यवसाय करण्यास सुरवात केली. कंपनी स्थापन झाल्यानंतर त्यांनी शिवम आणि वरद हे मसाल्याचे दोन स्वतःचे ब्रॅण्ड विकसित केले. आपले उत्पादन तयार करताना त्यांनी चव, गुणवत्ता, दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली नाही. त्यामुळे अल्पवधीतच त्यांना ब्रॅण्डसला सर्व ठिकाणाहून मागणी येण्यास सुरवात झाली. (Youth Choose Business Instead Of Job, Balaji Munde Develop His Own Masala Brand)
राज्यातील १४ जिल्ह्यात विक्री
शिवम आणि वरद या दोन ब्रॅण्डच्या माध्यमातून त्यांनी हळद पावडर, मिरची पावडर, धने पावडर, काळा मसाला, बंगा मसाला, बिर्याणी मसाला, चटपटा मसाला, कांदा लसूण मसाला, सांभार मसाला, मटण मसाला, मटण-कोरमा ग्रेव्ही मिक्स, व्हेज ग्रेव्ही मिक्स, पापड मसाला, शाही गरम मसला, अंडा रस्सा मसाला, गुलाब जामून मसाले असे विविध प्रकारचे मसाले तयार करण्यास सुरवात केली. तयार झालेले मसाले बालाजी मुंडे हे महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात विक्री करत आहेत. यासाठी त्यांच्याकडे जिल्हा व तालुकानिहाय वितरक आहेत. हे वितरक होलसेल, रिटेलमध्ये मसाले विक्री करण्यासाठी देतात. त्यांच्याकडील मसाल्यास मराठवाड्यात सर्वाधिक मागणी आहे. त्यांच्याकडे २ रुपयांपासून तर ३ किलोपर्यंत मसाल्यांच्या १३० विविध प्रकारच्या सर्वोत्कृष्ट पॅकिंग आहे.
मसाल्यांसाठी देशभरातून मागवला जातो कच्चा माल
बालाजी मुंडे यांनी ज्या ठिकाणी मसाले तयार करण्याच्या चांगल्या दर्जाच्या मशीनरी आहे अशा मशीनरी दिल्ली, मुंबई, दक्षिण भारतातून मागविले. तसेच मसाल्यासाठी लागणारा कच्चा माल ज्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे अशा देशभरातील ठिकाणाहुन ते मागवतात. ज्या भागात चांगल्या दर्जाची मिरची, कांदे, हळद, लसूण असेल अशा ठिकाणी ते स्वतःचा माल खरेदी करतात. त्यांच्याकडील मसाल्याच्या दर्जा उच्च असल्याने त्याला मागणी सुद्धा चांगली आहे. आज त्यांच्या कंपनीत जवळपास ५५ कामगार, कर्मचारी काम करत आहेत.
ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास
बालाजी मुंडे यांनी मसाले तयार करताना ग्राहक आणि मार्केट या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केला. ग्राहकांना मसल्यामध्ये चव, गुणवत्ता, दर्जा चांगला लागतो. मसाल्यास वेगळी चांगली चव राहिली तर ग्राहक त्याची पुन्हा-पुन्हा ऑर्डर देत असतात. बालाजी मुंडे यांनी मार्केटमध्ये जेवढ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट आहे ते सर्व चेक केले. यानंतर या मसाल्यांपेक्षा आपले मसाले वेगळे, सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी त्यांना प्रयत्न केला आहे. त्यात त्यांना यश सुद्धा आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.