नवी दिल्ली: प्रत्येक सामान्य व्यक्तीला बँकिंग क्षेत्राशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री जन धन योजना' सुरु केली होती. याअतंर्गत भारतातील लाखो नागरिकांनी बँकेत जन धन अकाउंट काढले होते. या योजनेअंतर्गत सरकारी अनुदाने, पेंन्शन आणि इतर डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर लाभार्थ्यांच्या खात्यात येतात.
प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) झिरो बॅलन्स खातं उघडलं जातं. लाभार्थी त्यांची बचत या अकाउंटवर ठेऊ शकतात. कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती बिकट असताना हे अकाउंट लाभार्थ्यांना खूप फायदेशीर ठरलं आहे. कारण या खात्यावर झिरो बॅलन्स असतानाही 5 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळत आहे.
जर तुम्हाला जन धन खात्यावरील या सुविधेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर बँक खात्याला जोडावं लागणार आहे. जर आधार नाही जोडलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. तसेच तुम्ही मागील 6 महिन्यांपासून जन धनच्या खात्यातून ट्रांजेक्शन केली असावीत. जर तुम्ही जनधन खातेधारक असाल तर या दोन अटींची पुर्तता केली तरच तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी पात्र ठराल.
जन धनचं खातं (jan dhan account) उघडल्यापासून तुमच्या व्यवहाराचा इतिहास चांगला असेल तरंच या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. जर एखाद्याच्या जन धनच्या बँक अकाउंटवरून एक किंवा दोनवेळाच ट्रांजेक्शन झालं असेल तर त्या व्यक्तीला ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळू शकणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.