Zomato: 50 टक्क्यांनी वाढतील झोमॅटोचे शेअर्स, तज्ज्ञांना विश्वास…

भारताच्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी मार्केटचा व्यवसाय पुढील दशकात 7 पटीने वाढू शकतो, ज्याचा थेट फायदा झोमॅटोला होणार.
zomato
zomatosakal
Updated on

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) शेअर्स पुढील एका वर्षात सुमारे 50 टक्के वाढतील असा अंदाज ब्रोकरेज फर्म एम्के ग्लोबलने (Emkay Global) व्यक्त केला आहे. भारताच्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी मार्केटचा व्यवसाय पुढील दशकात 7 पटीने वाढू शकतो, ज्याचा थेट फायदा झोमॅटोसारख्या कंपन्यांना होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Zomato shares will have been in uptrend or increase by 50 percent in upcoming days)

zomato
Zomato: झोमॅटोचे शेअर्स खरेदी करा; मिळेल 60% पर्यंत परतावा

सध्या फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये फक्त 2 मोठ्या कंपन्या आहेत. झोमॅटोने त्याच्या मजबूत ब्रँड नावाने, जवळपास 50 टक्के मार्केट शेअर, ब्लिंकिट आणि हायपरप्युअरद्वारे बाजारसाईजमध्ये वाढ आणि कंपनीला नफा मिळवून दिल्याने, पुढील वर्षांमध्ये त्याच्या निव्वळ नफ्यात 40 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एमके ग्लोबलने झोमॅटोच्या शेअर्सना बाय रेटिंग दिली आहे आणि पुढील एक वर्षात 90 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

हे कंपनीच्या सध्याच्या किंमतीपेक्षा जवळपास 50 टक्के जास्त आहे. या वर्षी आतापर्यंत झोमॅटोचे शेअर्स सुमारे 56.28 टक्क्यांनी घसरले असताना एमकेने ही टारगेट दिले आहे. पण गुरुवारी झोमॅटोच्या शेअर्समध्ये मजबूती दिसून आली आणि एनएसईवर 6.46 टक्क्यांनी वाढून 61.80 रुपयांवर बंद झाले.

zomato
Zomato Shares : झोमॅटोचे शेअर्स घ्यायची 'ही' आहे योग्य वेळ?

पुढील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत तोट्यातून बाहेर येण्याचे टारगेट कंपनीने ठेवल्याचे समजते आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग तोटा 150 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीचा कॅश फ्लो पॉझिटीव्ह आहे आणि आता त्यांचा फोकस ब्रेकइव्हनमधून बाहेर पडण्याचे असल्याचे कंपनीचे सीएफओ अक्षत गोयल यांनी सांगितले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.