Layoffs 2023 : कर्मचारी कपात सुरूच! आता Zoom कंपनीही देणार कर्मचाऱ्यांना नारळ; कारण...

झूमने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ब्लॉग पोस्टद्वारे या कपातीबद्दल माहिती दिली आहे.
Zoom Layoffs
Zoom Layoffs Sakal
Updated on

Layoffs Latest News : जगभरातील मंदीमुळे, अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. आता या यादीत झूमचेही नाव जोडले गेले आहे. अलीकडेच, झूमने आपल्या कर्मचार्‍यांपैकी 15 टक्के म्हणजेच 1300 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी जगभरातील अनेक टेक स्टार्टअप्समध्ये कर्मचारी कपातीचा टप्पा पाहायला मिळत आहे. झूमने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ब्लॉग पोस्टद्वारे या कपातीबद्दल माहिती दिली आहे.

कंपनीचे सीईओ यांनी दिली माहिती :

ब्लॉग पोस्टमध्ये माहिती देताना कंपनीचे सीईओ एरिक युआन यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग बंदिस्त होते, तेव्हा लोकांनी झूम सेवेचा जोरदार वापर केला.

कोरोना महामारीच्या 24 महिन्यांत, घरातून काम केल्यामुळे झूम वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत 3 पट वाढ नोंदवली गेली. पण महामारीनंतर जगभरात मंदीचे संकट आले आहे.

अशा परिस्थितीत अनेक कंपन्या या नव्या वातावरणात स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच बदलत्या परिस्थितीनुसार ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच सीईओ एरिक युआन म्हणाले की, इतर कंपन्यांप्रमाणे आमच्याकडूनही काही चुका झाल्या आहेत. यामुळे कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागत आहे. आम्हाला आमच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 15% म्हणजे 1300 लोकांना कामावरून काढून टाकावे लागेल.

Zoom Layoffs
Employment News : मंदीतही संधी! आता 'ही' कंपनी देणार 30,000 लोकांना नोकऱ्या

सीईओ म्हणाले की, यूएस-आधारित प्रभावित कर्मचार्‍यांना 16 आठवड्यांचा म्हणजे 4 महिन्यांचा पगार, आरोग्य सेवा कव्हरेज, 2023 वर्षासाठी कॉर्पोरेट बोनस आणि स्टॉक युनिट्स दिले जातील. त्याचबरोबर इतर देशांतील कर्मचाऱ्यांना देशांच्या कायद्यानुसार मदत दिली जाईल.

अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात :

गेल्या काही महिन्यांतील मंदीमुळे अनेक टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. डेलने सोमवारी जाहीर केले की, त्यांनी 6,650 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

त्याच वेळी, दिग्गज कंपनी Google ने जानेवारी 2023 पासून आतापर्यंत एकूण 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. याशिवाय ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, मायक्रोसॉफ्ट यांनीही कर्मचारी कपात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.